Gautam Gambhir  esakal
क्रीडा

Gautam Gambhir : विराट - रोहित नाही तर 'हा' भारताचा गेम चेंजर फलंदाज; गंभीर कोणाबद्दल बोलतोय?

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा आपल्या बेधडक वक्तव्यासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. भारताने वनडे वर्ल्डकप 2023 ची फायनल गाठल्यानंतर गौतम गंभीरने देखील टीम इंडियाच्या या देदिप्यमान कामगिरीवर आपलं मत व्यक्त केलं.

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, माझ्या दृष्टीने यंदाच्या वर्ल्डपमधील भारताचा सर्वात प्रभावी फलंदाज हा श्रेयस अय्यर आहे. गंभीरने अय्यरची संघातील स्थानासाठी संघर्ष करण्यापासून ते वर्ल्डकपच्या बाद फेरीत फक्त 70 चेंडूत शतक ठोकण्यापर्यंतचा प्रवास उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

गंभीर पुढे म्हणाला की, 'तो दुखापतग्रस्त झाला. त्याचे संघातील स्थान डळमळीत होते. तो संघातील पक्क्या स्थानासाठी लढत होता. आता त्याने वर्ल्डकपच्या बाद फेरीत 70 चेंडूत शतक ठोकले आहे. तो फायनलमध्ये ज्यावेळी मॅक्सवेल आणि झाम्पा गोलंदाजी करतील त्यावेळी भारताच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा फलंदाज असेल.

बुधवारी न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या सेमी फायनल सामन्यात श्रेयस अय्यरने ऐतिहासिक कामगिरी केली. तो आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला मधल्या फळीतील फलंदाज ठरला.

संपूर्ण स्पर्धेत श्रेयस अय्यर हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. त्याने 75.14 च्या सरासरीने 526 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट हे 113 इतके आहे. त्याने आतापर्यंत दोन शतकी तर तीन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. तो सध्या वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.

सेमी फायनलमध्ये अय्यरने 70 चेंडूत 105 धावा ठोकल्या. यात आठ षटकार आणि चार चौकार मारले. त्यानी ही आपली खेळी 150 च्या स्ट्राईक रेटने साकारली.

भारत आता अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध अंतिम सामना खेळणार आहे. यावेळी सर्वांची नजर ही श्रेयस अय्यरवर असणार आहे. गंभीरच्या मते तो भारताचासाठी सर्वात महत्वाचा फलंदाज आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

Latest Maharashtra News Updates : मतदारांवर प्रभाव टाकणारा राजकीय प्रचार केल्यास होणार कारवाई

SCROLL FOR NEXT