विराट कोहली आणि गौतम गंभीर या दिल्लीचे दोन दिग्गज खेळाडूमध्ये आयपीएल सामन्यानंतर मैदानावर झालेलं भांडण सगळ्यांनी पाहिले. लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांने ट्विटर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे आता नवीन चर्चाना उधाण आले आहे.
गंभीरने ट्वीट केलं आहे की, "दबावाचे कारण देऊन दिल्ली क्रिकेटमधून पळून गेलेला माणूस क्रिकेटची चिंता म्हणून सशुल्क पीआर करण्यास उत्सुक आहे! यह कलयुग है जहाँ 'भगोडे' आपणी 'अदालत' चलाते हैं." या ट्वीटमध्ये कोणाचं नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर या ट्वीटचा रोख नेमका कोणाकडे अशी चर्चा क्रीडा जगतात सुरू आहे.
कोहली-गंभीरमध्ये नेमकं काय झालं होतं?
आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यानंतर लखनौच्या एकना स्टेडियमवर जोरदार भांडण पाहायला मिळाले. दुसऱ्या डावाच्या 17व्या षटकात सुरू झालेली ही बाचाबाची सामन्यानंतर हस्तांदोलनात वाढली. या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद भर मैदानात दिसून आला. या दोघांमध्ये हाणामारी होण्याचीच परिस्थिती निर्माण झाली होती. आयपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत विराट आणि गंभीर यांना सामना मानधनाची सर्व रक्कम कापून घेण्याची शिक्षा केली; तर लखनौ संघाचा खेळाडू अफगाणिस्तानचा नवीन उल हक याच्यावरही दंडाची कारवाई करण्यात आली.
विराट वादावर काय म्हणाला?
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विराटने एक पोस्टर शेअर केला होता. ज्यामध्ये मेसेज लिहिला होता की, आपण जे काही ऐकतो ते फक्त मत असतं, तथ्य नाही. आपण जे पाहतो तो आपला दृष्टीकोन असतो, पण सत्य काही वेगळेच असते. या प्रतिक्रियांवरून विराटने काल रात्रीच्या घटनेवरच आपली भूमिका ठेवली आहे.
दोघेही दिल्लीतील खेळाडू
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद जगजाहीर आहे. विशेष म्हणजे ते दोघेही दिल्ली या एकाच राज्यातील खेळाडू आहेत, देशांतर्गत क्रिकेट ते एकत्रितपणे खेळलेले आहेत. गंभीर आणि विराट यांच्यातील हा वाद यंदाच्या स्पर्धेतून निर्माण झाला नाही, तर १० वर्षांपूर्वीही हे दोघेही खेळाडू भरमैदानात असेच एकमेकांना भिडले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.