India Vs Pakistan World Cup  esakal
क्रीडा

India Vs Pakistan : BCCI अँटी नॅशनल... तरूणींचे नृत्य अन् फुलांचा वर्षाव; अहमदाबादमधील 'त्या' व्हिडिओवर वादंग

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan World Cup : भारताने अफगाणिस्तानचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपला सलग दुसरा सामना जिंकला. आता भारताचा सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे.

मात्र ज्या पद्धतीने पाकिस्तान संघाचे हॉटेलमध्ये स्वागत झाले त्याची सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटली आहे. सोशल मीडिायवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाकिस्तानी संघाच्या स्वागत करताना हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये काही युवती नृत करताना दिसत आहेत.

पाकिस्तानी संघ जात असताना त्यांच्यावर फुलांचा आणि फुग्यांचा वर्षाव करण्यात येत होता. त्यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशन सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल होऊ लागले. काही लोकांना पाकिस्तानी खेळाडूंसमोर महिलांनी नृत्य करणं रूचलं नाही.

सोशल मीडियावरील एक युजरने (@Pun_Starr) व्हिडिओ शेअर करत पोस्ट केली, 'ज्यावेळी हैदराबादमध्ये डीजेच्या घोषणेनंतर प्रेक्षकांनी पाकिस्तान जितेगा असं म्हटलं त्यावेळी आयटी सेलने त्यांच्यावर अँटी नॅशनल असा शिक्का मारला. आता पाकिस्तानी संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. बीसीसीआयने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुली नाचत आहेत, फुलांचा वर्षाव होत आहे. काय आता बीसीसीआय अँटी नॅशनल आहे?

अहमदाबादमध्ये जबरदस्त पोलीस बंदोबस्त

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना सुरू होणार आहे. दरम्यान सामन्याची 50 खोटी तिकीटे छापणे आणि लोकांना तील लाख रूपयांना ते विकल्याप्रकरणी चार लोकांना अटक केली आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. चार आरोपी पैकी तीन आरोपी हे 18 वर्षाचे आहेत तर चौथा आरोपी हा 21 वर्षाचा आहे.

अहमदाबाद शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चैतन्य मांडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी भारत - पाकिस्तान सामन्याचं एक वैध तिकीट खरेदी केलं त्यानंतर एका आरोपीच्या दुकानात फोटोशॉप सॉफ्टवेअरचा उपयोग करत वैध तिकीट स्कॅन करून त्याच्या जवळपास 200 नकली कॉपी तयार केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Nashik Traffic Route: मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Google Crome Sell : क्रोम ब्राऊजर विकून टाका! US मधून गुगलच्या मालकांना आला फोन, नेमकं प्रकरण काय?

Eye Care Tips : दुषित हवेचा डोळ्यांवर होतोय थेट परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार, उमेदवारांच्या दुचाकी फेरीमुळे मार्ग खोळंबले

SCROLL FOR NEXT