नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. दोन्ही सामन्यात यजमान भारताला पराभवाचा धक्का बसला. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला नाही तर ते मालिका गमावू शकतात. कटक येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 149 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने पार केले. भारताच्या या पराभवानंतर संघाचा कर्णधार ऋषभ पंतच्या निर्णयांवर आक्षेप घेतले जात आहेत. (Graeme Smith Sunil Gavaskar Criticize Rishabh Pant For Sending Axar Patel Over Dinesh Karthik)
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात खराब झाली होती. अशातच ऋषभ पंतने सामन्यातील महत्वाच्या वळणावर एक मोठा निर्णय घेतला. त्याने अनुभवी दिनेश कार्तिकच्या ऐवजी अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवले. यावर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर जाम भडकले. ते म्हणाले की फिनिशर आहे म्हणून त्याला फक्त 4 - 5 षटके शिल्लक असतानाच फलंदाजीला पाठवाने असे नाही. ते जेवढावेळ क्रीजवर घालवतील तेवढाच संघाला फायदा होतो.
सुनिल गावसकर म्हणाले, 'काही वेळा तुम्ही एखाद्यावर फिनिशर म्हणून लेबल लावता. तुमचा असा ग्रह होतो की फिनिशर म्हटलं की तो 15 व्या षटकानंतर फलंदाजीला येणार, तो 12 व्या 13 व्या षटकात फलंदाजीला येऊ शकत नाही. मात्र वास्तवात त्यांना जर तुम्ही लवकर फलंदाजीला पाठवले तर त्यांच्या क्षमतेनुसार ते फक्त षटकार मारतील असे नाही. ते ज्यावेळी लवकर फलंदाजीला येतील त्यावेळी ते परिस्थिती समजून खेळ करतील आणि परिस्थितीशी जुळवून घेतील. त्यानंतर 4 - 5 षटके राहिल्यानंतर आक्रमक खेळ करतील.'
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार स्मिथने देखील पंतच्या दिनेश कार्तिकच्या आधी अक्षर पटेलला पाठवण्याच्या निर्णयावर टीका केली. तो म्हणाला, 'मला हे कळालं नाही की भारताचा सर्वात अनुभवी दिनेश कार्तिक असताना हा निर्णय कसा घेतला गेला. त्याने भारताकडून किती सामने खेळले आहेत याचं तरी भान असायला हवं. आयपीएलचा विचार करू नका तुम्ही अक्षर पटेलला दिनेश कार्तिकच्यावर बढती कशी देऊ शकता. हे समजण्यापलिकडे आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.