gukesh replaces anand as indias top chess player after 37 years sakal
क्रीडा

Chess : बुद्धिबळामध्ये गुकेशची ऐतिहासिक झेप; आनंदला मागे टाकणारा ३७ वर्षांमधील भारताचा पहिलाच खेळाडू

आनंद आता २७५४ रेटिंगसह नवव्या स्थानावर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचा १७ वर्षीय बुद्धिबळपटू डी. गुकेश याला नुकत्याच पार पडलेल्या विश्‍वकरंडकातील पाचव्या फेरीत मॅग्नस कार्लसन याच्याकडून पाचव्या फेरीत हार पत्करावी लागली असली तरी जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत (फिडे) त्याने ऐतिहासिक झेप घेतली आहे. तो आता २७५८ रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे.

भारताचे महान खेळाडू विश्‍वनाथन आनंद यांना त्याने मागे टाकले आहे. आनंद आता २७५४ रेटिंगसह नवव्या स्थानावर आहेत. आनंदला मागे टाकत क्रमवारीत आगेकूच करणारा गुकेश हा ३७ वर्षांमधील भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. गुकेश आता भारताचा पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे.

कोरोनाच्या काळात गुकेशने ग्रँडमास्टर विष्णू प्रसन्ना यांच्यासमवेत बुद्धिबळाचा सराव केला. २०२२ मधील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होईपर्यंत त्याने १२७ लढती खेळून आपली रेटिंग वाढवली. त्याची रेटिंग २६१४ पासून २७२५ पर्यंत वाढली.

यामुळे त्याला २५ व्या स्थानावर झेप घेता आली. त्यानंतर बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या पहिल्या आठ फेऱ्यांत विजय साकारत गुकेशने २७०० रेटिंगचा टप्पा ओलांडला. या वर्षी ७६ लढती खेळून गुकेशने २७२५ ते २७५८ अशी रेटिंगमध्ये मजल मारली.

आनंद आता सक्रिय नाहीत

विश्‍वनाथन आनंद यांनी पाच वेळा विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला आहे, पण सध्या ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान सक्रिय नाहीत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून जागतिक बुद्धिबळ संघटनेचे (फिडे) उपाध्यक्ष म्हणून आनंद कार्यरत आहेत. आता ते समालोचनही करत असतात.

जागतिक बुद्धिबळातील अव्वल २० खेळाडू

१) मॅग्नस कार्लसन (२८३९ रेटिंग), २) फॅबियानो कारुआना (२७८६ रेटिंग), ३) हिकारू नाकामुरा (२७८० रेटिंग), ४) लिरेन डिंग (२७८० रेटिंग), ५) एलीरेझा फिरॉझा (२७७७ रेटिंग), ६) इयान नेपोनियाची (२७७१ रेटिंग), ७) अनिश गिरी (२७६० रेटिंग), ८) डी. गुकेश (२७५८ रेटिंग), ९) विश्‍वनाथन आनंद (२७५४ रेटिंग), १०) वेस्ली सो. (२७५३ रेटिंग),

११) रिचर्ड रॅपोर्ट (२७५२ रेटिंग), १२) सर्जी कर्जाकिन (२७५० रेटिंग), १३) लिनिएर डॉमिंनगेझ (२७४५ रेटिंग), १४) तैमोर राजाबोव (२७४५ रेटिंग), १५) लेव्होन ॲरोनियन (२७४२ रेटिंग), १६) शाखरियार मामेद्यारोव (२७३४ रेटिंग), १७) लियाम ली (२७३३ रेटिंग), १८) ॲलेक्झँडर ग्रिसचूक (२७३२ रेटिंग), १९) आर. प्रज्ञानंद (२७२७ रेटिंग), २०) मॅक्सिम वॅचिएर (२७२७ रेटिंग).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT