Gurdeep Singh Won bronze Medal In 109 Kg Weightlifting In Commonwealth Games 2022 Birmingham  esakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : गुरदीपने पटकावले कांस्य पदक; वेटिलिफ्टिंगमध्ये दस का दम!

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारताचा वेटलिफ्टर गुरदीप सिंगने (Gurdeep Singh) 109 + किलो वजनी गटात कांस्य पदकाला गवसणी घातली. गुरदीपने जिंकलेल्या पदकामुळे भारताची वेटलिफ्टिंगमधील (Weightlifting) पदक संख्या दुहेरी आकड्यात म्हणजेच 10 पदकांवर पोहचली आहे. गुरदीपने एकूण 390 किलो वजन उचलले. गुरदीपने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 388 किलो वजन उचलले होते. त्यामुळे त्याच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची आशा होती. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेपेक्षा दोन किलो वजन जास्त उचलले. दरम्यान, वेटलिफ्टिंग पुरूष 109 + किलो वजनीगटात पाकिस्तानच्या मोहम्मद नूर दस्तगिर बट्टने एकूण 405 किलो वजन उचलत गेम रेकॉर्डसह सुवर्ण पदक पटकावले. तर न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यूने एकूण 394 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले.

गुरदीपने राष्ट्रकुल स्पर्धेच्या 109 + किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात 167 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. त्यानंतर गुरदीपने दुसऱ्या प्रयत्नात 167 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. तिसऱ्या प्रयत्नात गुरदीपने वजन वाढवत 173 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्यात यश आले नाही. त्यामुळे स्नॅच फेरीत गुरदीप इंग्लंडच्या गॉर्डन शॉ सोबत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

स्नॅच प्रकारातील दोन प्रयत्न वाया गेल्यानंतर गुरदीपने क्लीन अँड जर्कमध्ये दमदार पुनरागमन केले. त्याने पहिल्याच प्रयत्नात 207 किलो वजन उचलले. त्यामुळे त्याचे क्लीन अँड जर्कच्या पहिल्या प्रयत्नानंतर एकूण वजन 374 किलो झाले. मात्र गुरदीपला दुसऱ्या प्रयत्नात 215 किलो वजन उचलण्यात अपयश आले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात गुरदीपने 223 किलो वजन यशस्विरित्या उचलत गेम रेकॉर्ड बनवला. त्याने एकूण 390 किलो वजन उचलले.

मात्र न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यूने क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात 224 किलो वजन उचलून गेम रेकॉर्ड आपल्या नावावर केले. मात्र हे फार काळ टिकले नाही. पाकिस्तानच्या मोहम्मद नूर दस्तगिर बट्टने क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात 225 किलो वजन उचलले. त्यामुळे त्याचे एकूण वजन 398 किलो झाले. त्याने गेम रेकॉर्ड आपल्या नावावर केले. बट्टने दुसऱ्या प्रयत्नात 232 किलो वजन उचलून सुवर्ण पदकाची आपली दावेदारी प्रबळ केली. त्याने एकूण उचलेले वजन 405 किलो पर्यंत पोहचले. त्यामुळे भारताचा गुरदीप तिसऱ्या क्रमकांकावर फेकला गेला त्याला कांस्य पदक मिळाले. अँड्र्यूचा देखील तिसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे त्यालाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT