Cricket News esakal
क्रीडा

Cricket News : 'या' पठ्ठ्यानं टी 10 मध्ये 43 चेंडूत ठोकल्या 193 धावा! 22 षटकार अन् 14 चौकार मारत केलं वर्ल्ड रेकॉर्ड

अनिरुद्ध संकपाळ

Cricket News T10 Cricket Highest Score : मॉडर्न क्रिकेटमध्ये फलंदाज कधी कोणता विक्रम करेल याचा काही नेम नाही. कधीकाळी कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणे म्हणजे दिव्य असायचं मात्र आता वनडे काय टी 20 मध्ये देखील फलंदाज द्विशतकाच्या जवळ पोहचत आहेत.

आता तर टी 10 क्रिकेटमध्ये देखील फलंदाज हमजा सलीम दारने मोठा धमाका केला. त्याने 43 चेंडूत 193 धावा ठोकल्या. त्याचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले नाही तर क्रिकेट इतिहासात टी 10 क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला असता.

जरी त्याचे द्विशतक पूर्ण झालं नसलं तरी हमजाने टी 10 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर केला आहे.

युरोपियन क्रिकेटने हमजा सलीम दारचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा सामना कॅटल्युना जॅग्वार आणि सोहल हॉस्पिटलेट यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात जॅग्वारने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 10 षटकात बिनबाद 257 धावा ठोकल्या. त्यात हमजा सलीम दारने 43 चेंडूत 193 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने तब्बल 22 षटकार आणि 14 चौकार मारले. त्याने या धावा 449 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.

यापूर्वी टी 10 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सेऊस डू प्लॉय याच्या नावावर होता. त्याने याच वर्षी 5 ऑक्टोबरला हंगेरीकडून 40 चेंडूत 163 धावा ठोकल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: बंगळुरूने तगडा खेळाडू जाऊ दिला, मुंबई इंडियन्सने संधीचं सोनं केलं

Kolhapur Result : ताकदीने लढा देऊनही 'त्यांना' विजयाची 'तुतारी' फुंकता आली नाही; शरद पवारांसमोर आता मोठं आव्हान!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने मानले ऐश्वर्याचे आभार ; "ती आराध्याजवळ घरी आहे म्हणून..."

MLA Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे वाहतूक कोंडी अन् पाणीप्रश्न सोडविणार

SCROLL FOR NEXT