Harbhajan Singh esakal
क्रीडा

Harbhajan Singh : एक चूक सुधारण्यासाठी दुसरी चूक... हरभजन अश्विनच्या निवडीवर संतापला

अनिरुद्ध संकपाळ

Harbhajan Singh : भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मयादेशात होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर टिका केली आहे. या संघात युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. (Yuzvendra Chahal)

मात्र आर अश्विनची (R. Ashwin) निवड करण्यात आली आहे. यामुळे हरभजन सिंग निराश झाला आहे. वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मात्र आशिया कपमध्ये अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी आशिया कपच्या फायनलमध्ये वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी अनुभवी आर अश्विनची निवड करण्यात आली आहे. पुन्हा युझवेंद्र चहलला डावलण्यात आल्यामुळे हरभजन सिंग आश्चर्य व्यक्त केले.

हरभजन सिंग आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, 'मला कळत नाहीये की युझवेंद्र चहलची निवड का केली जात नाहीये. चहलचे नाव या संघात असायला हवे. त्याला संधी देण्यात आलेली नाही. त्याला का संधी नाकारण्यात येते हे कळत नाहीये.'

'त्याचे कोणासोबत भांडण आहे किंवा तो कुणालातरी बोलला असेल. माल माहिती नाही. जर तुम्ही फक्त स्कीलबाबत बोलाल तर त्याचं नाव संघात असायला हवं कारण अनेक भारताचे खेळाडू या मालिकेत आराम करत आहेत.

चूक सुधारण्यासाठी केली अजून एक चूक

हरभजन सिंग म्हणाला की, टीम इंडियाने चूक सुधारण्यासाठी अजून एक चूक केली आहे. आधी त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला बोलावलं. तो आशिया कपच्या संघात नव्हता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत आर अश्विन देखील सामील होणार आहे. याचा अर्थ संघ व्यवस्थापन ऑफ स्पिनरच्या शोधात आहे.

त्यांना संघात ऑफ स्पिनरची निवड न करण्याच्या त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. मात्र त्यांनी अजून एक ऑफ स्पिनर संघात निवडला. जर त्यांच्यासमोर उजव्या हाताचे अनेक फलंदाज आले तर आपले गोलंदाज अडचणीत सापडू शकतात. गरज नसताना या सर्व गोष्टी का करायच्या? हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे. ते आपली आधीची चूक सुधारण्यासाठी अजून एक चूक करत आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT