बर्मिंगहॅम : भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने तो सध्या विलगिकरणात आहे. दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील एकमेव कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत जर रोहित शर्मा सामन्यापूर्वी फिट झाला नाही तर त्याच्या जागी भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात विचारला जात आहे. आयसीसीने देखील आपल्या ट्विट अकाऊंटवरून हाच प्रश्न विचराला त्यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने देखील कमेंट केली आहे. (Harbhajan Singh Reply ICC Tweet Jasprit Bumrah Should Be a Replacement Of Captain Rohit Sharma)
आयसीसीने 'जर इंग्लंड विरूद्धच्या महत्वाच्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नाही तर कोणत्या भारतीय खेळाडूला कर्णधार केले जावे?' असा प्रश्न ट्विट करून विचारला. त्यावर हरभजनने फक्त एक नाव लिहून प्रतिक्रिया दिली. त्याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव सुचवले. जर रोहित शर्मा कसोटी सामन्याला मुकलाच तर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर येऊ शकते अशी चर्चा सुरू होती. आता हरभजननेही त्याच्या नावालाच पसंती दिली आहे.
भारताचा उपकर्णधार केएल राहुल हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो इंग्लंड दौऱ्याला आधीच मुकला आहे. त्यानंतर आता कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशात संघात उपकर्णधार देखील नाही त्यामुळे आता रोहित उपलब्ध झालाच नाही तर कोण संघाचे नेतृत्व करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयने देखील रोहित शर्माचा बॅकअप प्लॅन म्हणून मयांक अग्रवालला इंग्लंडला रवाना केले आहे.
बर्मिंगहॅम कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. ही कसोटी गेल्या वर्षी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील स्थगित करण्यात आलेली पाचवी कसोटी आहे. त्यावेळी भारतीय संघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा सामना स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी भारत मालिकेत 2 - 1 अशा आघाडीवर होता. जर या पाचव्या कसोटी सामन्यात भारत विजय मिळवू शकला तर 2008 नंतर भारत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.