Hardik Pandya sakal
क्रीडा

Hardik Pandya: हार्दिक अन् नताशानं 3 प्रकारे केलं होतं लग्न! करोडो रुपये खर्च, जाणून घ्या कशी झाली होती प्रेमाची सुरुवात

Sandip Kapde

Hardik Pandya Natasa Stankovic Announce Mutual Divorce

काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. अखेर आज 18 जुलै रोजी त्यांनी स्वत: याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी याची माहिती दिली आणि त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केला.

हार्दिक आणि नताशा यांची प्रेमकहाणी जितकी आकर्षक होती तितकीच त्यांच्या विभाजनाची बातमी दु:खद आहे. त्यांच्या लग्नातील विविध प्रकारांच्या किस्स्यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.

टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांचं प्रेमकहाणीत अनेक वळणं आली आहेत. त्यांची पहिली भेट झाली तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली.

हार्दिक आणि नताशा यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं, पण ते केवळ 4 वर्षेच टिकू शकलं. मे 2020 मध्ये, कोरोना काळात त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि याची घोषणा केली. 3 महिन्यांनंतर, जुलै महिन्यात त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला.

करोडो रुपये खर्च-

लग्नाच्या तीन वर्षांनंतर 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी धूमधडाक्यात लग्न केलं. यावेळी, हार्दिक पांड्याने उदयपूरच्या रॅफल्स वेन्यूवर डेस्टिनेशन वेडिंग केलं.

या वेळी त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं. त्यांच्या वेडिंगसाठी त्यांनी करोडो रुपये खर्च केले होते. एका वेबसाईटनुसार त्यांच्या वेन्यूची किंमतच 2-3 करोड रुपये होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra : 1cm ने हुकलो! नीरज चोप्राच्या हातातून थोडक्यात 'Diamond' निसटला; पठ्ठ्याने जेतेपदासाठी पूर्ण जोर लावला

Neeraj Chopra ने 0.01m च्या फरकाने जेतेपद गमावले; पण, Prize Money म्हणून वाचा किती कमावले...

UP Building Collapsed: उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; 8-10 जण अडकले

Duleep Trophy 2024: तिलक वर्मा-प्रथम सिंग यांची शानदार शतके; भारत अ संघाला विजयाची संधी

Crime: भांडुप हादरलं! बोलण्यास नकार; युवक संतापला, रागात महिलेवर चाकूने वार, नंतर स्वत:चा चिरला गळा

SCROLL FOR NEXT