Asia Cup 2022 : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. बुमराह दुखापतीतून सावरण्यासाठी सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे यूएईमध्ये आशिया कपमधून बाहेर पडला आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत त्याची गोलंदाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ मंगळवारी दुबईला पोहोचला आहे. तत्पूर्वी संघाचे सर्व खेळाडू तयारीत गुंतले होते.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानेही बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान तोही बुमराहप्रमाणेच सेलिब्रेशन करताना दिसत आहे. याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही अनेकदा बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसला आहे. हार्दिकने इंस्टाग्रामवर केवळ त्याची बॉलिंग अॅक्शन कॉपी केली नाही तर त्याच्या सेलिब्रेशनचीही कॉपी केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले की, फॉर्म कसा आहे, बूम ?.
जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौऱ्यापासून क्रिकेट खेळलेले नाही. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेच्या दौऱ्यांमधूनही विश्रांती देण्यात आली. आशिया कपमधून बाहेर पडलेल्या जसप्रीत बुमराहला टी-20 विश्वचषकात खेळणार आहे. कारण टी-20 विश्वचषकात बुमराहला संघात घेणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या पत्नी नताशासोबत सुट्टी घालवून मुंबईत परतला होता. हार्दिक पांड्या आशिया कप 2022 मध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. आयपीएलनंतर फलंदाजीसोबतच पांड्याच्या गोलंदाजीतही सुधारणा झाली आहे. हार्दिक पांड्या आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीने प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.