IND vs NZ ODI Hardik Pandya Natasa Stankovic : शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी केली, पण टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ज्या पद्धतीने आऊट झाला तो चर्चेचा विषय राहिला आहे.
हार्दिक पांड्याला आऊट करण्याबाबत चाहते सतत आपली मते देत आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांच्या मते हार्दिक पांड्या नाबाद होता, पण पंचाच्या चुकीमुळे टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र, आता हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिने पंचांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय डावाच्या 40व्या षटकात हार्दिक पांड्या पॅव्हेलियनमध्ये परतला. पांड्याला कट शॉट मारायचा होता, पण तो चुकला. त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि टॉम लॅथम कॅच घेतला. त्यानंतर अंतिम निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला. मात्र हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. आता हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने इन्स्टाग्रामवर आपली बाजू मांडली आहे. त्याचवेळी नताशा स्टॅनकोविकच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहते सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने 50 षटकात 8 विकेट गमावत 349 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार द्विशतक झळकावले. शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि 9 षटकार मारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.