Harmanpreet Kaur  
क्रीडा

Harmanpreet Kaur : भारतीय कर्णधाराला 'जोर का झटका धीरेसे'! ICC ने हरमनप्रीत कौरला दिला मोठा दणका

सकाळ ऑनलाईन टीम

ICC ODI Women Rankings Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या बांगलादेशमधील वनडे मालिका संपल्यानंतर तिच्या वाईट वागणुकीमुळे चर्चेत आहे. बांगलादेशातील मालिका संपल्यानंतर हरमनप्रीतने खराब अंपायरिंगवरही वक्तव्य केले होते. तसेच, आऊट झाल्यानंतर तिने बॅट स्टंपवरही मारली होती.

याशिवाय ट्रॉफी मिळाल्यानंतर प्रेझेंटेशन सोहळ्यातही तिने बांगलादेशी संघाशी गैरवर्तन केले. या सर्व कारणांमुळे आता त्याच्यावर बंदीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. मात्र, आयसीसीकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आता मंगळवारी भारतीय कर्णधाराला आयसीसीकडून मोठा धक्का बसला आहे.

आयसीसीने हरमनप्रीत कौरला दिला दणका

वास्तविक हा धक्का या वादाशी संबंधित नसून ताज्या ICC महिला एकदिवसीय क्रमवारीशी संबंधित आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधाराला याचा फटका बसला आहे. दुसरीकडे उपकर्णधार स्मृती मानधना हिला याचा फायदा झाला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या भारतीय कर्णधाराला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. ती आता सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरली आहे. दुसरीकडे मंधानाला एका स्थानाचा फायदा झाला असून ती सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर गेली आहे.

गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर, टॉप 10 च्या यादीत दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. या यादीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे भारताची दीप्ती शर्मा 9व्या तर राजेश्वरी गायकवाड 10व्या स्थानावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय दीप्ती शर्मा सातव्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा नॅट सीव्हर ब्रंट या यादीत अव्वल आहे. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजांच्या क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT