Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या मालकांनी दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमधला संघ खरेदी केला होता. या संघाला एमआय केपटाऊनच्या (MI Cape Town) नावाने ओळखले जाते. या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव हा 19 सप्टेंबरला होणार आहे. यापूर्वी एमआय केपटाऊनने आपल्या कोचिंग स्टाफची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज सायमन कॅटिच हा एमआय केप टाऊनचा मुख्य प्रशिक्षक असेल तर दक्षिण आफ्रिकेचा दर्जेदार माजी फलंदाज हाशिम अमला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून एमआयशी जोडला जाईल. (Hashim Amla Simon Katich Join Mumbai Indians)
एमआय केपटाऊनने आपल्या कोचिंग स्टाफची घोषणा केली आहे. एमआयने दिग्गज फलंदाज हाशिम अमलाची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याच्या नावावर सर्वात वेगवान 2000, 3000, 4000, 5000 आणि 6000 वनडे धावा करण्याचा विक्रम आहे. दुसरीकडे सायमन कॅटिचने देखील दीर्घकाळ आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्याचबरोबर तो एक अव्वल दर्जाचा प्रशिक्षक म्हणूनही ओळखला जातो.
याचबरोबर एमआय केपटाऊनने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये न्यूझीलंडचा माजी फलंदाज जेम्स पॅमेंटचा फिल्डिंग कोच म्हणून समावेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि डोमॅस्टिक कोच रॉबिन पीटरसन जनरल मॅनेजर म्हणून संघासोबत असणार आहे. हे दोघेही बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्सशी जोडले गेले होते. सध्या पॅमेट मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच म्हणून काम पाहतो. तर रॉबिन पिटरसन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.