Australian Open Rafael Nadal won historical 21st grand slam defeat Daniil Medvedev esakal
क्रीडा

Australian Open: पराभवालाही 'पराभूत' करत नदालने इतिहास रचला

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न: राफेल नदाल (Rafael Nadal) अंतिम सामना खेळतोय आणि तो तीन सेटमध्येच हार मानणार असे सहसा होत नाही. तसंच आजच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) फायनलमध्ये देखील झालं नाही. डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) विरूद्धच्या सामन्यात पहिल्या दोन सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर झुंजार राफेलन नदालने शेवटचे तीन सेट जिंकून आपले ऐतिहासिक २१ वे ग्रँडस्लॅम खिशात टाकले. राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनची पाच सेटची पाच तासापेक्षा जास्त काळ चाललेली रोमांचने भरलेली फायनल २-६, ६-७ (५-७), ६-४, ६-४, ७-५ अशी जिंकली. याचबरोबर तो टेनिस इतिहासातला (Tennis History) २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. तसेच चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकणारा चौथा खेळाडू ठरला. (Australian Open Rafael Nadal won historical 21st grand slam defeat Daniil Medvedev)

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली त्यावेळी सर्वच टेनिस चाहत्यांचे लक्ष राफेल नदालच्या विक्रमी २१ व्या ग्रँडस्लॅम (21st Grand Slam) विजेतेपदाकडे होते. कारण राफेल नदाल रॉजर फेडरर (Roger Federer) आणि नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) ग्रँडस्लॅमच्या शर्यतीत मागे टाकण्याच्या अगदी जवळ पोहचला होता. मात्र मेदवेदेवने पहिला सेट ६-२ असा सहज जिंकत राफेल नदालसह टेनिस चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवला.

पहिला सेट जिंकल्यानंतरही टेनिस (Tennis) चाहत्यांना राफेल नदाल पुनरागमन करेल अशी आशा होती. अपेक्षेप्रमाणे राफाने दुसऱ्या सेटमध्ये आपल्या झुंजार वृत्तीचे दर्शन घडवले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली. मात्र झुंज देण्यात २५ वर्षाचा रशियन ३५ वर्षाच्या स्पॅनिश अर्माडावर भारी पडला. त्याने दुसरा सेट टाय ब्रेकवर (Tie Breaker) नेला. तेथेही नदाल आणि मेदवेदेवमध्ये चांगलीच झुंज झाली. अखेर युवा रक्त असलेल्या मेदवेदेवने दुसरा सेट ७-६ (७-५) असा जिंकला.

तिसऱ्या आणि मेदवेदेवसाठी निर्णायक असलेल्या सेटमध्ये युवा रक्त आणि अनुभव दोघेही पुन्हा एकमेकांना भिडले. राफेल नदाल (Rafael Nadal) शेवटपर्यंत लढतो. हा त्याचा इतिहास आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही पिछाडी भरून काढत त्याने सामना जिंकला होता. त्याच्या चाहत्यांकडून या ऐतिहासिक ठरणाऱ्या सामन्यात हीच अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या बाजूला मेदवेदेव (Daniil Medvedev) त्याला कडवी टक्कर देत होता. त्याने तिसरा सेट ४-४ असा बरोबरीत आणला होता. मात्र नदालने तिसरा सेट ६-४ असा जिंकत सामन्यातील आपले आव्हान अजून संपले नसल्याची गर्जना केली.

दीर्घ सामन्यात हातखंडा असलेल्या राफेल नदालने चौथ्या सेटमध्ये मेदवेदेवच्या फिटनेसची चाचणी घेतली. मेदवेदेवने देखील चौथ्या सेटमध्ये झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र राफेल नदालने अनुभव पणाला लावत चौथा सेट ६-४ असा जिंकला. दोघांनीही दोन दोन सेट जिंकल्याने सामना आता बरोबरीत आला होता. त्यामुळे पाचव्या सेटवर नदालच्या २१ व्या ग्रँडस्लॅमचे आणि मेदवेदेवच्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम विजयाचे भवितव्य ठरणार होते.

पाचव्या सेटमध्येही नदालने १-० अशा पिछाडीनंतर १-१ अशी बरोबरी करत झुंज कायम असल्याचा संदेश दिला. नदाल आणि मेदवेदेव यांच्यातील काटें की टक्कर पाचवा सेट २-२ अशा बरोबरीत घेऊन गेली. तिसऱ्या गेममध्ये राफाने मेदवेदेवची सर्व्हिस ब्रेक केली आणि ३-२ अशी आघाडी घेतली. ही आघाडी राफेल नदालने ५-३ अशी पुढे नेत २१व्या ग्रँडस्लॅमवरील पकड मजबूत केली. मात्र मेदवेदेवने जोरदार पुनरागमन करत सेट ५-५ असा बरोबरीत आणला. परंतु राफेल नदालने आपल्या अनुभवाच्या जोरावर निर्णयाक सेट ७-५ असा जिंकत २१ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा इतिहास रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT