India beat Australia esakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 Hockey Live : भारताने हर'मन' जिंकले! १९७२ नंतर ऑस्ट्रेलियाला नमवून रचला इतिहास

Hockey in Paris Olympic 2024 : भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत गटातून दुसऱ्या स्थानासह आपली बाजू भक्कम केली.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 India Hockey Live Update : भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला ३-२ असे पराभूत केले आणि १९७२ नंतर भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारतीय संघाने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात हा विजय मिळवला. गोलरक्षक पी आर श्रीजेश याने पुन्हा एकदा त्याला अभेद्य भिंत का म्हणतात, हे सिद्ध करून दाखवले.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ब गटातील साखळी सामना खेळला गेला. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान आधीच पक्के केले आहे, परंतु त्यांचे गटातील स्थान या लढतीपूर्वी निश्चित नव्हते. त्यांना उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्स, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन यांच्यापैकी एकाशी भिडावे लागेल. भारतीय चौथ्या स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यास त्यांना दुसऱ्या गटातील अव्वल संघाविरुद्ध खेळावे लागणार होते. आज ऑस्ट्रेलियाला नमवून त्यांना गटात अव्वल दोनमध्ये स्थान पटकाण्याची संधी होती.

दोन मिनिटांत दोन गोल...

ऑस्ट्रेलियाने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ केला. ५व्या मिनिटाला क्रेग थॉमसचा गोलप्रयत्न गोलरक्षक पी आर श्रीजेशने हाणून पाडला. १२व्या मिनिटापर्यंत ऑस्ट्रेलियन्सचे ३-४ गोलसाठीचे प्रयत्न रोखण्यात श्रीजेशला यश मिळाले होते. १२व्या मिनिटाला भारताकडून हल्लाबोल झाला. ललित उपाध्यायचा गोलच्या दिशेने जाणारा चेंडू ऑसी गोलरक्षकाने रोखला, परंतु चेंडू रिबाऊंडमध्ये अभिषेककडे गेला आणि भारतीय खेळाडूने अविश्वसनीय मैदानी गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नवर भन्नाट गोल करून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली.

भारताचा भक्कम बचाव...

जखमी ऑस्ट्रेलियाकडून जबरदस्त आक्रमण पाहायला मिळाले. दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या १० मिनिटांत त्यांनी भारतीय बचावफळीची कसोटी घेतली. २५व्या मिनिटाला मनप्रीतने गोलजाळीत जाणारा चेंडू चतुराईने रोखला, परंतु रेफरीने ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर दिला. यावर खरं तर ऑसी खेळाडूचा शॉट चुकला होता, परंतु त्यांनी सांघिक खेळ करून पहिला गोल मिळवला. क्रेग थॉमच्या गोलने ऑस्ट्रेलियाने पिछाडी १-२ अशी कमी केली...ऑसींनी खाते उघडले असले तरी भारताचा बचाव भक्कम दिसला.

सिंग इज किंग...

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाचे पुनरागमनाचे सर्व प्रयत्न भारतीयांनी हाणून पाडले. ३२व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हरमनप्रीतने त्यावर आणखी एक सुरेख गोल करून भारताची आघाडी ३-१ ने मजबूत केली. ४१व्या मिनिटाला ऑसी खेळाडूंनी चांगली रणनीती आखताना गोलसाठी संधी निर्माण केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांचा ताळमेळ चुकला. ५३व्या मिनिटाला अभिषेकने केलेला गोल ग्राह्य धरला गेला नाही.

५५ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला स्ट्रोक मिळाला आणि ब्लॅक गोव्हर्सने गोल करून पिछाडी २-३ अशी कमी केली. शेवटच्या पाच मिनिटांत ऑस्ट्रेलियाने पुनरागमासाठी जोरदार प्रयत्न केले. पण भारताने ३-२ असा विजय पक्का केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस शिवाजीपार्क येथे दाखल

SCROLL FOR NEXT