Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : 'कडक' बीसीसीआय अध्यक्षांनी 'रागीट' विराटचे पंख छाटले

बीसीसीआयने रोहित राज सुरु करत विराट कोहलीचे पंख छाटले

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआयने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाची घोषणा करता करता वनडेमधून विराट कोहलीची (Virat Kohli) कर्णधार पदावरून उचलबांगडी केल्याचा बॉम्ब टाकला. गेल्या दोन दिवसांपासून रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कसोटीचे उपकर्णधारपद जाईल अशी चर्चा होती. मात्र कसोटी उपकर्णधार पदाबरोबरच त्याला एकदिवसीय संघाच्याही कर्णधारपदाची लॉटरी लगेच लागली. बीसीसीआयने एका वाक्यात विराट कोहलीची सत्ता आता संपुष्टात आली असल्याचे सांगून टाकले. मात्र ही एका वाक्यातली उचलबांगडी नाही. तर याला अनेक वर्षाची पार्श्वभूमी आहे. (How BCCI top Offical Remove Virat Kohli from Captaincy After Rift in Indian Team)

'कडक' मास्तर आणि अनिल कुंबळेचा अपमान (Virat Kohli)

भारतीय क्रिकेट इतिहासात अनिल कुंबळे (Anil Kumble) नावाला जरी ग्लॅमर नसले तरी तरी हे नाव इतिहासातील दिग्गज नाव आहे. ज्या व्यक्तीने देशाकडून ६१९ विकेट घेतल्या आहेत त्या व्यक्तीकडे अनुभव आणि क्रिकेटचे 'प्रॅक्टिकल नॉलेज'चा खजाना असणार यात शंका नाही. हे नॉलेज आणि अनुभव भारतीय संघाच्या कामी येण्याची सुवर्ण संधी २०१६ ला चालून आली होती.

त्यावेळी भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरभ गांगुली(Sourav Ganguly) आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण (VVS Lxman) या दिग्गजांची सल्लागार समिती लाभली होती. त्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी अनिल कुंबळे (Anil Kumble) या सभ्य आणि फक्त आणि फक्त क्रिकेटशी नाते असलेल्या व्यक्तीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.

मात्र ज्यावेळी अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ वाढवण्याची वेळ आली त्यावेळी विराट कोहलीने अनिल कुंबळे हे कडक मास्तरासारखे वागतात असे म्हणत आपल्या मर्जीतील रवी शास्त्रींच्या नावाचा हट्ट धरला. विराट हट्टापुढे या दिग्गजांनाही संघातील वातावरण शांत ठेवण्यासाठी विराट हट्ट मान्य केला. तेथूनच विराटच्या मनमानीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

विराट कोहलीची मनमानी (Virat Kohli)

विराटच्या मागणीनुसार विराटला आपल्या हो हो करणारा प्रशिक्षक ( मॅनेजर ) लाभला होता. त्यामुळे संघात विराट कोहलीचाच शब्द अंतिम होता. त्यातच याच दरम्यानच्या काळात अनुभवाने अत्यल्प असेलेली निवडसमिती भारतीय क्रिकेट विश्वाला लाभली होती. या सर्व पार्श्वभूमीवर विराट कोहलीची (Virat Kohli) संघातील मनमानी वाढली. त्याच्या जवळ असणाऱ्या खेळाडूंना ते फेल गेले तरी सातत्याने संधी मिळत गेली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केएल राहुल (KL Rahul).

केएल राहुल (KL Rahul) हा गुणी खेळाडू आहे. त्याच्या क्षमतेबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र विराट कोहलीबरोबरच्या मैत्रीमुळेच त्याला इतरांच्या तुलनेत फार संधी मिळाली. अशी संधी इतर खेळाडूंच्या नशिबात क्वचितच आली. चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) काही काळ कसोटी संघातून वगळला गेला होता. अश्विनची तर कारकिर्दच संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत होता. मात्र कसोटी क्रिकेटची( Test Cricket) दारे त्याच्यासाठी बंदच होती. म्हणजे तो परिपूर्ण क्रिकेटपूट होण्यापासून वंचित राहिला होता.

संघ निवडीबरोबरच निर्णय घेण्यातही विराटची मनमानी सुरु होतीच. अती आक्रमकता कधी कधी संघासाठी घातक ठरत होती. आक्रमकतेचा अट्टाहस अनेक खेळाडूंना त्यांचा मूळ स्वभाव आणि खेळण्याची शैली बदलण्यास भाग पाडत होती.

बीसीसीआयची धुरा माजी कर्णधाराकडे

दरम्यान, बीसीसीआयमध्ये न्यायालयीन प्रशासक जावून खेळाडू राज सुरु झाले होते. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक असलेला माजी कर्णधार आता बीसीसीआयचा अध्यक्ष झाला होता. सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) आपल्या हातात बीसीसीआयचा लगाम घेतला होता. ज्यावेळी तो बीसीसीआयचा अध्यक्ष झाला त्यावेळीच विराट कोहली आणि त्याच्यामधील नातेसंबंध कसे राहतील याबाबत साशंकता निर्माण झाली होती.

दरम्यान, सुरुवातीच्या काळात सौरभ गांगुलीनेही (Sourav Ganguly) विराट कोहलीबाबत जुळवून घेणे पसंत केले. मात्र विराट कोहली आणि स्थीतप्रज्ञ रवी शास्त्री (Ravi Shatri) यांची संघातील मनमानी सुरुच होती. मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्याच्या बाबतीत विराट कोहली फारसा नशीबवान ठरत नव्हता. दुसरीकडे रोहित शर्मा सातत्याने आयपीएलसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत आपले नेतृत्वगुण विजेतेपदाला गवसणी घालून सिद्ध करत होता.

अश्विनबाबत दुजाभाव; अनेक वरिष्ठ खेळाडूंची तक्रार (Virat Kohli)

दरम्यान, टीम इंडियात (Team India) दोन गट निर्माण झाले होते. विराट कोहली संघातील वरिष्ठ खेळाडूंना खिसगणतीत पकडत नव्हता. अश्विनला (R Ashwin) निवडसमिती संघात घेत होती. मात्र विराट कोहली त्याला बँचवर बसवून त्याचे गुणवत्ता वाया घालवत होता. दुसऱ्या बाजूला रोहित शर्माच्या नेतृत्वाची चर्चा टिपेला पोहचली होती. त्याची तुलना थेट एमएस धोनीबरोबर केली जाऊ लागली. त्याच्यात आणि धोनीमध्ये आयपीएल टायटल जिंकण्यात स्पर्धा लागली. त्यात सध्या तरी रोहितच आघाडीवर आहे.

दुसऱ्या बाजूला टीम इंडियात विराटच्या नेतृत्वाबाबत नाराजीचा सूर अधिक तीव्र होत होता. अश्विन (R Ashwin) पाठोपाठ अजून काही वरिष्ठ खेळाडूंनी विराटची बीसीसीआयकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या बातम्या बाहेर येत होत्या. त्याचा संघावर आणि संघाच्या कामगिरीवर परिणामही दिसत होता. अखेर कडक बीसीसीआय अध्यक्षांनी या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरुवात केली.

विराटचे पंख छाटले (Virat Kohli)

विराट कोहली फलंदाज म्हणून ग्रेटच आहे. मात्र एक कर्णधार म्हणून त्याला मर्यादा आहेत. हे वेळोवेळी दिसूनही आले आहे आणि अनेक दिग्गजांनी ते बोलूनही दाखवले आहे. विराट कोहलीला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. ही गोष्ट त्याच्या विरोधात जात होती. त्यातच त्याची फलंदाजीतील कामगिरीही खालावत होती. त्यामुळे संघात नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले.

बीसीसीआयनेही (BCCI) विराट कोहलीला त्याचे मोठी स्पर्धा जिंकण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल आरसा दाखवण्यास सुरुवात केली. त्यातच ऑस्ट्रेलियात विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने ऐतिहासिक मालिका जिंकून दिली. त्यानंतर विराटच्या नेतृत्वावरील प्रश्नचिन्ह अजूनच गडद झाले.

आपीएलमध्येही विराट कोहलीला कर्णधारपदाची दीर्घ कारकिर्द मिळून आरसीबीला एकदाही आयपीएल विजेतेपद जिंकून देता आले नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला अल्टीमेट दिला. विराट कोहलीने टी २० संघाचे कर्णधारपद युएईमधील टी २० वर्ल्डकपनंतर सोडणार असल्याचे घोषित केले. वास्तविक नोटिसवर असलेला कर्णधार घेऊन वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा फटका भारताला बसला. भारत ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला.

यामुळे विराट कोहलीच्या २०२३ मध्ये मायदेशातील एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याच्या इच्छेला तिलांजली मिळाली. बीसीसीआयने विराट कोहलीला स्वतःहून एकदिवसीय कर्णधारपद सोडण्यासाठी अल्टीमेटम दिल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने येत होत्या.

दरम्यान, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कोसटी संघाच्या निवडीवेळीच विराट कोहलीची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्याची घोषणा केली. बीसीसीआयने विराटच्या मनमानी कारभाराचे पंख छाटले. जी चूक युएईमध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकप (T20 World Cup) सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने केली होती. ती चूक बीसीसीआयने आता सुधारली. विराट कर्णधार असताना अनिल कुंबळे यांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षक पद सोडावा लागले होते. आता बीसीसीआयच्या कडक प्रमुखांनी विराट कोहलीचे पंख छाटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT