World Cup 2023 
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धोनीचे पडणं... बूट भिजणं कसं ठरलं भारताच्या विजयाचं कारण

Kiran Mahanavar

येत्या ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला भारतात सुरुवात होणार आहे. यंदा भारत या स्पर्धेचा आयोजक आहे. २०११ ला पण वर्ल्डकप भारतात झाला होता. त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २८ वर्षानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण हा किस्सा आहे २०११ च्या वर्ल्डकपचा जेव्हा अंतिम सामन्यात धोनी धावा काढताना पडला आणि भारताच्या विजयाचं कारण ठरला.

कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचे निर्णय अनेकदा धाडसी तरी बिनचूक ठरले आहेत. २०११ च्या स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामनाही असाच होता. श्रीलंकेचे २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोहली बाद झाल्यामुळे धोनी आधीच्या नियोजनानुसार फलंदाजी करणाऱ्यासाठी मैदानात आला. खेळायला लागल्यावर तो एक धाव घेताना तो पडला. पडल्यानंतर चिडण्यापेक्षा तो बुटाकडे बघून फक्त हसला. त्यावेळी त्याच्या हास्यामागील कारण कुणालाच कळले नाही. पण, पडण्याचा आणि नंतर हसण्याचा किस्सा धोनीकडून ऐकल्यावरच त्यावेळी तो का हसला याचे कोडे उलगडले.

सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाल्यावर विराट कोहलीने गौतम गंभीर सोबत चांगली भागीदारी केली. विराट कोहली बाद झाला तेव्हा खरे, तर युवराजने फलंदाजीला येणे अपेक्षित होते, कारण धोनी संपूर्ण स्पर्धेत फलंदाज अपयशी ठरला होता आणि युवराजने सातत्याने उत्तम कामगिरी केली होती. पण, या स्पर्धेत डावखुरा फलंदाज बाद झाला की युवराज आणि उजव्या हाताचा फलंदाज बाद झाला की धोनी असे नियोजन ठरले होते.

धोनीने अशा गंभीर परिस्थितीतही हे धोरण कायम ठेवले. तो म्हणाला, "संपूर्ण स्पर्धेत आपण राबवलेली योजना अंतिम सामन्यात कशाला बदलायची... मी चांगल्या लयीत नाही मान्य आहे... जास्तीत जास्त काय होईल मी लवकर बाद होईन... चिंता कशाला करायची... विराट बाद झाला आहे मी जातो फलंदाजीला," असे म्हणत धोनी मैदानात उतरला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले.

खेळपट्टीवर स्थिरावल्यावर धोनी एकदा दुसरी धाव होण्याच्या शक्यतेने पहिली धाव जोरात पळाला. दुसऱ्या धावेकरता उलटा वळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पडला. त्या वेळी त्याने आपल्या बुटाकडे बघितले आणि फक्त तो हसला. त्याचे बूट भिजले होते. धाव काढताना घसरल्यावर हसायचे का? हेच कुणाला कळले नाही.

पण, धोनीच्या डोक्यात त्याचवेळी विजयाचा मार्ग तयार झाला होता. ते षटक संपल्यावर धोनी गंभीरला म्हणाला, "पुढची दोन षटके नुसता चेंडू जमिनीलगत मारून आपण एकेरी धावा काढूयात... एकदा का चेंडू ओला झाला की ना मलिंगा त्या चेंडूवर स्विंग करू शकेल, ना मुरली स्पीन... खूप दंव पडले आहे. गौतम अब हमें कोई हरा नहीं सकता... रन्स हो जायेंगे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

SCROLL FOR NEXT