FIFA Revenue Model FIFA World Cup 2022  Esakal
क्रीडा

FIFA Revenue Model : क्लब केंद्रीत फुटबॉल, तरी फिफा एवढा बक्कळ पैसा कुठून कमवतं?

अनिरुद्ध संकपाळ

FIFA Revenue Model FIFA World Cup 2022 : या जगातील सर्वात लोकप्रीय उत्पादन तुम्ही तायर करताय, मात्र यासाठी तुम्हाला फारसे काही कष्ट करावे लागत नाहीत. तरी देखील तुम्हाला बक्कळ पैसा मिळतोय. हे एवढं सोपं उत्पन्नाचे मॉडेल आहे. FIFA अर्थात फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन ही जागतिक फुटबॉल संघटना आहे. ही संस्था जगातील सर्वात लोकप्रीय खेळ फुटबॉलमधून तुफान पैसा कमवत आहे. 2018 मध्ये रशियात झालेल्या फुटॉबल वर्ल्डकप स्पर्धेतून फिफाने जवळपास 4.6 बिलियन डॉलर्स (37 हजार 500 कोटीं रूपयांपेक्षाही जास्त ) महसूल कमावला होता.

फिफा आपल्या महसुलातून वर्ल्डकप आयोजित करणाऱ्या देशाच्या आयोजन समिती, बक्षीस रक्कम, प्रवास आणि संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला तसेच लेगसी फंडद्वारे आयोजित देशात फुटबॉलचा विकास करण्यासाठी पैसे देते. यंदाच्या कतारमधील फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला एकूण 440 मिलियन डॉलर्स (जवळपास 3578 कोटी रुपये) पैकी 44 मिलिनय डॉलर्स (जवळपास 342 कोटी रुपये) मिळणार आहे.

फिफाचा ताळेबंद हा प्रत्येक 4 वर्षांनी येणाऱ्या वर्ल्डकपच्या अनुशंगाने तयार केला जातो. फिफाचा शेवटचा जाहीर झालेला ताळेबंद हा 2015 ते 2018 असा होता. या सायकलमध्ये फिफाला 6.4 बिलियन डॉलरचे उत्पन्न मिळाले होते. तर 2021 च्या एका वर्षात फिफाला 766 मिलियन महसूल मिळाला होता. फिफाला इतका पैसा कुठून मिळतो?

1 ) टीव्ही राईट्स

फिफाला जास्तीजास्त महसूल हा टी व्ही प्रसारण हक्क विकून मिळतो. यामध्ये वर्ल्डकप आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश असतो. गेल्या आर्थिक सायकलमध्ये मिळवलेल्या 6.4 बिलियन डॉलर (52,240 कोटी रूपयांपेक्षा जास्त) पैकी फक्त 4.6 बिलियन डॉलर्स (37 हजार 500 कोटींपेक्षाही जास्त रूपये) रक्कम ही टीव्ही हक्कातून मिळाली आहे.

2 ) मार्केटिंग राईट्स

फिफा आपल्या स्पर्धांमध्ये मार्केटिंग राईट्सची विक्री करते. जगभरातील अनेक नावाजलेले ब्रँड्सला त्यांची जाहिरात दाखवण्यासाठी हे राईट्स विकेत घेतात. याचबरोबर फिफाच्या नॉन प्रॉफिट उपक्रमात देखील मोठमोठे ब्रँड्स फिफाचे भागीदार असतात. ते फुटबॉलचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्री आणि तळागाळापर्यंत विकास व्हावा यासाठी गुंतवणूक करत असतात. यामुळे जगात सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये या ब्रँड्सना आपल्या जाहिराती दाखवता येतात. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या अर्ध्या लोकांपर्यंत आपला ब्रँड नेता येतो.

फिफाने 2018 च्या वर्ल्डकप सायकलमध्ये मार्केटिंग राईट्स विकून 1.66 बिलियन डॉलर्स (13 हजार कोटी रूपयांच्या वर) कमाई केली होती.

3 ) तिकीट विक्री

फिफा टीव्ही राईट्स आणि मार्केटिंग राईंट्स बरोबरच तिकीट विक्रीतून देखील चांगला पैसा कमावते. फिफा इव्हेंटच्या तिकीट विक्रीचे संपूर्ण अधिकार हे त्यांच्याच उपकंपनीकडे आहेत. 2015 ते 18 या वर्ल्डकप सायकलमध्ये फिफाने तिकीट विक्रीतून 712 मिलियन डॉलर (5 हजार 800 कोटी रूपयांपेक्षा जास्त) कमावले होते.

2021 मध्ये झालेल्या अरब कपच्या तिकीट विक्रीतून जवळपास 12 मिलियन डॉलर महसूल मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी 6 लाख लोक उपस्थित होते. यंदाच्या कतार 2022 च्या वर्ल्डकपसाठी जवळपास तीन मिलियन (30 लाख) तिकिट्स विकली गेली आहेत. या वर्ल्डकपच्या तिकीटांची किंमत ही 100 डॉलरपासून 1,100 डॉलर्स पर्यंत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फिफा तिकीट विक्रीतून बक्कळ पैसा कमावणार हे निश्चित.

4 ) ब्रँडिंग आणि लायसन्स

फिफा आपल्या ब्रँडचे लायसन्सिंग करू देखील पैसा कमावते. फिफा फुटबॉल गेम्स हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या Electronic Arts (EA) चा आणि फिफाची 20 वर्षापासून भागिदारी आहे. या 20 वर्षात EA ने जवळपास 20 बिलियन डॉलर्सचा धंदा केला आहे. EA फिफाला या गेमचे हक्क मिळवण्यासाठी जवळपास वर्षाला 150 मिलियन डॉलर्स रूपये देते अशी माहिती मिळाली आहे. लायसन्सिंगमधून फिफाने 2021 मध्ये जवळपास 180 मिलिनय डॉलर्स कमवले होते. यात कपड्यांचे ब्रँड, रिटेल गेमिंग यांचा समावेळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT