How Zimbabwe and Scotland Can Qualify For ICC Men's ODI World Cup 
क्रीडा

ODI WC 2023 : सिकंदर झिम्बाब्वेला भारतात घेऊन येणार की... स्कॉटलंड घालणार खोडा! काय आहे समीकरण

Kiran Mahanavar

ICC Cricket World Cup Qualifiers 2023 Zimbabwe vs Scotland Super 6 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे आठ संघ आधीच निश्चित झाले होते, रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पात्रता फेरी खेळल्या जात आहेत. एकीकडे वेस्ट इंडिजचा संघ बाहेर गेले, तर दुसरीकडे श्रीलंका आता नववा संघ म्हणून विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. पण सध्या आणखी एका संघासाठी जागा आहे. यासाठी प्रामुख्याने दोन संघांचा दावा प्रबळ मानला जाणार आहे. विशेष म्हणजे आज हा सामना त्या दोन संघांमध्ये होणार आहे.

झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात चुरशीची लढत

2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता सामने खेळले जात आहेत. यावेळच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर श्रीलंकेचा संघ आठ गुणांसह आघाडीवर आहे. संघ मुख्य सामना खेळण्यासाठी पात्र झाला आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाचे सध्या सहा गुण आहेत, तर स्कॉटलंडचे चार गुण आहेत. आज झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडचे संघ आमनेसामने येणार आहेत.

झिम्बाब्वेने आज विजय मिळवला तर त्याचे एकूण गुण आठ होतील आणि यासह संघ पात्र ठरेल. दुसरीकडे स्कॉटलंडचे चार गुण असतील आणि हा संघ जिंकला तर त्याचेही सहा गुण होतील. आजचा सामना जिंकल्यास स्कॉटलंड पात्र ठरू शकणार नाही, पण एकीकडे झिम्बाब्वेच्या मार्गात अडथळा निर्माण होईल. दुसरीकडे सहा गुणांचा टप्पा गाठून ते आपले दावेदार आणखी मजबूत करतील. म्हणजेच आज दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो प्रकारचा सामना आहे.

आयर्लंड आणि नेपाळ यांच्यातही होणार सामना

झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडशिवाय आज आणखी एक सामना खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये आयर्लंड आणि नेपाळचे संघ आमनेसामने असतील, जरी या सामन्याला फारसे महत्त्व नाही. दुसरीकडे 5 जुलै रोजी ओमान आणि वेस्ट इंडिजचे संघ आमनेसामने असतील, या सामन्यात फारसे काही उरलेले नाही. स्कॉटलंडला त्यांचा पुढचा सामना आज 6 जुलै रोजी नेदरलँडशी खेळायचा आहे.

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पुढील सुपर 6 सामना 7 जुलै रोजी होणार आहे. श्रीलंका आधीच पात्र ठरला आहे आणि वेस्ट इंडिज बाहेर आहे त्यामुळे फारसा फरक पडत नाही. अशा परिस्थितीत आगामी काही सामनेच असे आहेत, ज्यात रोमांच कायम राहील. श्रीलंकेचा संघ आधीच मुख्य स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे. म्हणजेच येणारे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून होणार सुरू

2023 विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने आधीच जाहीर केले आहे. त्यानुसार पहिला सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दिवशी न्यूझीलंड आणि इंग्लंड आमनेसामने असतील. त्याचबरोबर टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान आता सर्व संघ सज्ज झाले असून तयारीही सुरू झाली आहे. यावेळी वर्ल्डकपमध्ये खेळणारा दहावा संघ कोणता हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT