Karoly Takacs Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: प्रयत्नांती प्ररमेश्वर! उजवा हात गमावला, पण तरी हार न मानता पठ्ठ्यानं डाव्या हातानं जिंकलं सुवर्णपदक

Inspirational Olympic Story: एक हात गमावल्यानंतरही दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या एका लढवय्या नेमबाजाची प्रेरणादायी कथा

Pranali Kodre

Hungary's Karoly Takacs Inspirational Olympic Story: खेळात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेताना प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न नक्की असतं, ते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचं आणि पदक जिंकायचं.

असंच स्वप्न एका नेमबाजाचंही होतं, पण त्यानं त्याच्या पहिल्या ऑलिम्पिकपूर्वीच त्याचा उजवा हात गमावला. मात्र त्यानं हार मानली नाही, त्यानं परिस्थितीवर मात केली. कोण होता हा नेमबाज, काय आहे त्याची कहाणी जाणून घेऊ.

तर, या नेमबाजाचं नाव कॅरोली टकास. हंगेरीमधील बुडापेस्टमध्ये २१ जानेवारी १९१० रोजी त्याचा जन्म झाला होता. तो नंतर आर्मीमध्ये सामील झाला. त्यानं नेमबाजीमध्ये इतकं कौशल्य मिळवलं होतं की वयाच्या २६-२७ व्या वर्षीच तो एक जगातील सर्वोत्तम नेमबाज म्हणून ओळखला जात होता. त्यानं तोपर्यंत बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या.

मात्र, १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश तो केवळ एक कनिष्ठ सेवक असल्यानं नाकारण्यात आला होता. त्या हंगेरीच्या संघात केवळ मोठ्या अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला त्या स्पर्धेत खेळता आलं नाही. पण त्यानं हार मानली नाही, त्यानं ट्रेनिंग सुरू ठेवली.

मात्र, त्याची परीक्षा संपली नव्हती. त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अग्निपरीक्षेला १९३८ मध्ये सामोरं जावं लागलं. आर्मीमध्ये असताना एक खराब ग्रेनेड त्याच्या उजव्या हातातच फुटलं. त्यामुळे त्याला त्याचा उजवा हातच गमवावा लागला. याच हातनं तो पिस्तूलने नेमबाजी करायचा. याच हातानं त्यानं अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या.

त्या घटनेनंतर अनेकांना वाटलं आता कॅरोलीची कारकीर्द संपली. त्याला या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये एक महिना रहावं लागलं. पण त्यानं यानंतरही हार मानली नाही. स्वप्नासाठी त्यानं लढायचं ठरवलं. त्याने एकट्याने डाव्या हाताने सरावाला सुरुवात केली.

अनेक महिने डाव्या हाताने केलेल्या सरावानंतर तो १९३९ मध्ये हंगेरियन नॅशनल पिस्तुल शूटींग चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी झाला आणि जिंकलाही. त्यानं नंतर हंगेरीच्या संघात स्थान मिळवत वर्ल्ड चॅम्पियनशीपही जिंकली.

मात्र, १९४० आणि १९४४ सालचे ऑलिम्पिक महायुद्धामुळे रद्द झाले. त्यानंतरही लोकांना वाटलं की आता कॅरोलीचं स्वप्न हे स्वप्नच राहणार. पण तो हार मानणाऱ्यांमधला नव्हता. त्यानं सराव सुरूच ठेवलेला.

अखेर १९४८ साली वयाच्या ३८ व्या वर्षी त्याचा समावेश लंडन ऑलिम्पिकसाठी हंगेरी संघात करण्यात आला. त्यानेही ही संधी न दवडता हंगेरीसाठी रापिड फायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.

इतकंच नाही, तर १९५२ साली हेलसिंकीला झालेल्या ऑलिम्पिकमध्येही त्यानं सुवर्णपद जिंकलं. तो १९५६ साली देखील ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. पण त्यावेळी त्याला पदक जिंकता आलं नाही. मात्र, त्यानं आलेल्या सगळ्या संकटांवर ज्याप्रकारे मात केली आणि यश मिळवलं, ते पुढे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

FIR lodged on Vinod Tawde: आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

World Men's Day : असंख्य पुरूषांच्या वाट्याला घुसमट; वेळीच मार्ग न सापडल्यास मानसिक आजारांसह व्यसनाधीनतेची भीती

SCROLL FOR NEXT