Mohammad Azharuddin 
क्रीडा

Mohammad Azharuddin : फिक्सिंग मध्ये सुटला अन् भ्रष्टाचारात अडकला! अझर पुन्हा गोत्यात

Kiran Mahanavar

Mohammad Azharuddin : यंदा वर्ल्ड कप 2023 भारतात खेळला जात आहे. या दरम्यान भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मॅच फिक्सिंगचा सामना करणार्‍या अझरुद्दीनसह हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या काही माजी अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे.

माजी कर्णधारासह अनेक अधिकाऱ्यांवर असोसिएशनच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हैदराबाद पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कांते बोस यांच्या तक्रारीच्या आधारे उप्पल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एचसीएचे माजी अध्यक्ष अझरुद्दीन आणि इतर माजी पदाधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, अझरुद्दीनने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याचे उत्तर दिले आहे.

अझरुद्दीनने पोस्टमध्ये लिहिले की, माझा कोणत्याही प्रकारे आरोपांशी संबंधित नाही. मी योग्य वेळी उत्तर देईन. माझी प्रतिष्ठा खराब करण्यासाठी केलेला हा स्टंट आहे. आम्ही खंबीर राहू आणि संघर्ष करू.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या सीईओने तक्रारीत म्हटले आहे की, तेलंगणा उच्च न्यायालयात पूर्वीचे अहवाल सादर केल्यानंतर ऑगस्टमध्ये सीए फर्मची नियुक्ती करण्यात आली होती. CA द्वारे 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. यामध्ये आर्थिक नुकसान, निधी वळवणे, मालमत्तेचा गैरवापर आणि कामकाजातील अनेक अनियमितता यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT