Angela Carini  esakal
क्रीडा

Olympic 2024 Controversy : 'त्या' पुरुष बॉक्सरकडून हरलेल्या अँजेलाला मिळाली भरपाई! ऑलिम्पिक विजेत्या एवढं मिळणार बक्षीस

Angela Carini - इटलीची बॉक्सर अँजला कॅरिनी सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तिने प्रतिस्पर्धी बॉक्सवर पुरुष असल्याचा दावा केला आहे.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Controversy : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ट्रान्सजेंटर बॉक्सर इमान खलिफ याला खेळण्याची परवानगी दिलीच कशी, हा वाद गाजतोय. महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बंदी घातलेल्या खलिफला ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. इटलीची महिला बॉक्सर अँजेला कॅरिनी हिने खलिफविरुद्धच्या सामन्यातू ४६ सेकंदात माघार घेतली होती. आतापर्यंतच्या कारकीर्दित इतका जोरात ठोसा आपण कधी खाल्ला नव्हता, असा दावा करून कॅरिनीने माघार घेतली. त्यानंतर खलिफ हा पुरुष असल्याचा दावा करण्यात आला गेला आणि २०२३ मध्ये त्याच्यावर बंदीची कारवाईही झाली होती. मग, ऑलिम्पिक समितीने त्याला परवानगी दिलीच कशी, हा मुद्दा पुढे आला.

बंदी घातलेल्या IBA ची उडी

आता या मुद्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने ( IBA) उडी घेतली आहे. IOC ने बॉक्सिंग महासंघावर बंदीची कारवाई केली आहे. तरीही IBA कॅरिनीच्या बाजूने मैदानावर उतरले आहेत आणि त्यानी इटालियन महिला बॉक्सरला ५० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ४२ लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पाचवा येणारा किंवा त्यापेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या बॉक्सरला बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा मे महिन्यात IBA ने केली होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅरिनी राऊंड ऑफ १६ मध्येच बाहेर पडली, तरीही IBA ने पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला जेवळी रक्कम मिळणार आहे, तेवढीच कॅरिनीला जाहीर केली आहे. IBA असं का करतेय? बॉक्सिंग महासंघाने २०२३च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खलिफवर लिंग पात्रता निकषात अपयशी ठरल्याने बंदी घातली होती. पण, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IBA च्या या नियमाशी सहमन नाही आणि त्यांनी मागच्या वर्षी IBAचे सदस्यत्वही काढून घेतले होते.

त्यामुळे आता आयबीएने कॅरिनी, तिचे कोच आणि इटालियन फेडरेशनला एकूण १ लाख डॉलरची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. उझबेकिस्तानची सितोरा तुर्दीबेकोव्हा हिलाही राऊंड ऑफ १६ मधून चायनीज तैपेईच्या लिन यू टिंग कडून हार मानावी लागली. टिंग याच्यावरही IBA ने बंदी घातली होती. त्यामुळे सितोरालाही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

'मला तिचे अश्रू पाहवत नव्हते. मी अशा परिस्थितींबद्दल उदासीन नाही आणि मी खात्री देतो की आम्ही प्रत्येक बॉक्सरचे संरक्षण करू. ते महिला बॉक्सिंग संपवायला निघाले आहेत आणि यामागचं कारण मला समजत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ पात्र खेळाडूंनीच रिंगमध्ये भाग घ्यायला हवा,’ असे आयबीएचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT