ICC Men's Women's Equal Prize Money ESAKAL
क्रीडा

ICC Men's Women's Equal Prize Money : मोठी घोषणा! आता ICC स्पर्धा जिंकल्यानंतर होणार नाही स्त्री - पुरूष भेदभाव

अनिरुद्ध संकपाळ

ICC Men's Women's Equal Prize Money : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सीलने आज (दि. 13) एक मोठी घोषणा केली. या घोषणेनुसार आता आयसीसी स्पर्धेत पुरूष आणि महिला संघाला स्पर्धा जिंकल्यानंतर एकसारखीच बक्षीस रक्कम मिळणार आहे. यात आता भेदभाव होणार नाही. यापूर्वी आयसीसी स्पर्धा जिंकल्यानंतर पुरूषांना महिलांपेक्षा जास्त रक्कम मिळायची. (ICC Cricket News)

आयसीसीने पुरूष आणि महिला संघामध्ये होणारा भेदबाव संपवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. हा निर्णय नक्कीच स्तुतीस पात्र आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटपटूंचा उत्साह वाढणार असून अनेक युवा मुली क्रिकेट खेळण्याकडे आकर्षित होणार आहेत. (Cricket News In Marathi)

बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी देखील आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट करून यावर आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले की स्त्री - पुरूष समानतेसाठी हा एक मोठा निर्णय आहे. आता आयसीसी स्पर्धांमध्ये पुरूष आणि महिला विजेत्या संघांना एक समान बक्षीस रक्कम मिळणार आहे. या आपण एकत्र पुढे जाऊ. (Jay Shah News)

जय शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'माझ्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नांना यश मिळावे यासाठी सहकारी क्रिकेट बोर्डांच्या सदस्यांनी समर्थन दिले त्याबद्दल धन्यवाद. भविष्यात आपण मिळून असं काम करू की जगभरात क्रिकेटचा चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार होईल.

आयसीसीने स्लो ओव्हर रेटचा नियम बदलला

आयसीसीने आता स्लो ओव्हर रेटच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा नियमातील बदल सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये लागू असणार आहे.

जर एखादा संंघ ठरलेल्या वेळेत ठरलेल्या षटकांपेक्षा कमी षटके टाकते. त्या प्रत्येक षटकावर पाच टक्के सामन्याचे मानधन कापण्याचा दंड ठोठवला जाईल. तसचे स्लो ओव्हर रेटसाठी सामन्याच्या मानधनाच्या जास्तीजास्त 50 टक्के रक्कम दंड म्हणून आकारता येणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT