धरमशाला - शेरास सव्वाशेर किंवा हल्ला आणि प्रतिहल्ला असा संघर्ष झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३८८ धावांची विक्रमी धावसंख्या उभारल्यानंतर त्यांनी केवळ पाच धावांनी विजय मिळवला. इतके जिगरबाज प्रयत्न न्यूझीलंडने केले. एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतल्या या सामन्यात ७७१ धावांचा पाऊस पडला.
ऑस्ट्रेलियाने ३८८ धावा केल्या असल्या तरी विजयासाठी त्यांना अखेरच्या चेंडूपर्यंत वाट पहावी लागली. अखेरपर्यंत लढणारा जिमी निशम शेवटून दुसऱ्या चेंडूवर धावचीत झाला, अन्यथा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने लागला असता अशी ३९ चेंडूंत ५८ धावांची टोलेबाजी त्याने केली.
आव्हान कितीही मोठे आणि कदाचित आवाक्याबाहेरचे असले तरी न्यूझीलंडने प्रयत्न सोडले नाहीत. २ बाद ७२ अशी अवस्था झाली असली तरी राचिन रवींद्रने ८९ चेंडूंत ११६ धावांचा झंझावात सादर करून लढा कायम ठेवला. डॅरेल मिचेलने अर्धशतकी खेळी केली. कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांना अपेक्षित योगदान देता आले नसले तरी निशमने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले होते.
त्याअगोदर सकाळी खेळ सुरू झाल्यावर डेव्हिड वॉर्नर आणि पहिलाच वर्ल्डकप सामना खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने कमाल केली. चौकार आणि षटकारांची अभूतपूर्व टोलेबाजी करताना त्यांनी ११७ चेंडूंत १७५ धावांची सलामी दिली, तेव्हा ऑस्ट्रेलिया चारशेच्या पलीकडे सहज मजल मारणार असे चित्र होते, पण न्यूझीलंड गोलंदाजांनी तेथेही धैर्य दाखवत ऑस्ट्रेलियाला ३८ व्या षटकापर्यंत ५ बाद २७४ धावांपर्यंत रोखले होते.
ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा टॉपगिअरमध्ये आला; परंतु पॅट कमिंसने चार षटकारांसह फटकावलेल्या १४ चेंडूंतील ३७ धावा दोन्ही संघांतील जय-पराजयाचे अंतर स्पष्ट करणारा ठरला.
संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया ४९.२ षटकांत सर्वबाद ३८८ (डेव्हिड वॉर्नर ८१ - ६५ चेंडू, ५ चौकार, ६ षटकार, ट्रॅव्हिस हेड १०९ - ६७ चेंडू, १० चौकार, ७ षटकार, मिचेल मार्श ३६, स्टीव स्मिथ १८, ग्लेन मॅक्सवेल ४१ - २४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, जोश इंग्लिस ३८ - २८ चेंडू ४ चौकार, १ षटकार, पॅट कमिंस ३७ - १४ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, बोल्ट १०-०-७७-३, सँटनर १०-०-८०-२, ग्लेन फिलिप्स १०-०-३७-३)
न्यूझीलंड ५० षटकांत ९ बाद ३८३ (राचिन रवींद्र ११६ - ८९ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार, डॅरिल मिचेल ५४ - ५१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, जिमी निशम ५८ - ३९ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, हॅझलवूड ९-०-७०-२, कमिंस १०-०-६६-२, झॅम्पा १०-०-७४-३)
५५ चौकार ३२ षटकार
या सामन्यात एकूण ५५ चौकार आणि ३२ षटकारांची आतषबाजी झाली. त्याची आकडेवारी अशी
ऑस्ट्रेलिया : ३२ चौकार;
२० षटकार
न्यूझीलंड : ३३ चौकार; १२ षटकार
वनडेतील एकाच सामन्यात सर्वाधिक धावा
८७२ दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया (जोहान्सबर्ग २००६)
८२५ भारत वि. श्रीलंका (राजकोट २००९)
८०७ वेस्ट इंडीज वि. इंग्लंड (सेंट जॉर्जस् २०१९)
७७१ ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड (धरमशाला २०२३)
७६४ नेदरलँड्स वि. इंग्लंड (अॅस्टेलवीन २०२२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.