ICC Cricket World Cup Qualifier 2023 sakal
क्रीडा

ICC WC 2023 Qualifier: विश्वकरंडक क्रिकेट पात्रता स्पर्धा आजपासून झिम्बाब्वेत! वेस्ट इंडीज, श्रीलंकेला अधिक संधी

सकाळ ऑनलाईन टीम

ICC Cricket World Cup Qualifier 2023 : भारतात होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीज आणि श्रीलंका हे माजी विजेते देश असणार की नाही, याच फैसला आजपासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतून होणार आहे. या दोन्ही देशांसह यजमान झिम्बाब्वेनेही सराव सामन्यात विजय मिळवलेला असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

या पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज, श्रीलंका यांच्यासह नेदरलँड, नेपाळ, अमेरिका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि संयुक्त अमिराती असे दहा संघ खेळणार आहेत, मात्र दोनच संघ यातून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. वेस्ट इंडीज आणि श्रीलंका हे अनुभवात उजवे असले तरी गाफील राहाण्याची चूक त्यांना महाग पडू शकते.

उंचपुऱ्या रोमवान पॉवेलने झळकावलेल्या वेगवान शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने सराव सामन्यात अमिरातीचा ११४ धावांनी पराभव केला. कर्णधार निकोलस पूरनने ७४ धावांची खेळी केली; परंतु नऊ चेंडूंत त्यांनी तीन विकेट गमावल्यामुळे विंडीजची अवस्था डावाच्या मध्यावर ७ बाद १९८ अशी झाली होती. पॉवेल याचवेळी मदतीला आला. त्याने किमो पॉलसह आठव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. पॉवेलने ५५ चेंडूंत १०५ धावा फटकावल्या. त्यामुळे वेस्ट इंडीजने ९ बाद ३७४ धावा उभारल्या.

अमिराती संघातूनही बासिल हमीदने शतकी खेळी केली. त्याने नाबाद १२२ धावा केल्या तरी अमिराती संघाला ११४ धावा कमी पडल्या. यानिक कॅरेह याने ५८ धावांत ४ विकेट मिळवल्या.

झिम्बाब्वेने स्कॉटलंडवर विजय मिळवला. ब्रँडन मॅकमुलेनचे अर्धशतक एका धावेने हुकले. स्कॉटलंडचा पूर्ण संघ १६३ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेने हे आव्हान २५ षटकांत पार करून पात्रता स्पर्धेची जोरदार तयारी केली. त्यांच्या सिकंदर रझाने २८ चेंडूंत ४४ धावा फटकावल्या.

मेंडिस, करुणारत्नेची शतके

दिमुथ करुणारत्नेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने अमेरिका संघाचा १९८ धावांनी पराभव केला. श्रीलंकेची १ बाद ३९ अशी सुरुवात झाल्यावर करुणारत्ने आणि कुसल मेंडिस यांची जोडी जमली. त्यांनी १९१ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेने ५० षटकांत ५ बाद ३९२ धावा केल्या. मेंडिसन ९१ चेंडूत १०५, तर करुणारत्नेने १०० चेंडूंत १११ धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT