WTC Point Table ICC Ashes 2023 : इंग्लंडने अॅशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना जिंकून मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन कसोटी सामने जिंकून 2 - 0 अशी आघाडी घेतली होती. मात्र शेवटचे दोन सामने इंग्लंडने जिंकून मालिका बरोबरीत सोडवली. मात्र या मालिकेत या दोन्ही संघांनी एक मोठी चूक केली त्यामुळे आयसीसीने त्यांचे WTC गुण कापले.
बुधवारी आयसीसीने आपल्या वेबसाईटवर एक पत्रक प्रसिद्ध केलं. या पत्रकात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत ठरलेल्या वेळेत षटके पूर्ण न केल्याने त्यांचे WTC गुण कापले. याचबरोबर सामन्याचे मानधन देखील कापण्यात आले आहे.
आयसीसी पत्रकात म्हणते. 'संशोधित नियमानुसार त्यांच्यावर ठरल्या वेळेत षटके न टाकल्यामुळे कारवाई केली आहे. त्यांच्या सामन्याच्या मानधनातील 5 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. तसेच दोन्ही संघांचा प्रत्येक षटकासाठी एक WTC गुण देखील कमी करण्यात आला आहे.'
चौथ्या कसोटीमध्ये स्लो ओव्हर रेट ठेवल्याने ऑस्ट्रेलियाचे 10 गुण कापले होते. तर इंग्लंडचे स्लो ओव्हर रेटमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पाच कसोटीमधील चार कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्याने 19 गुण कापण्यात आले आहेत.
आयसीसीने सांगितले की, 'इंग्लंडने पहिल्या कसोटीत निर्धारित वेळेत ठरल्यापेक्षा दोन षटके कमी टाकली, दुसऱ्या कसोटीत 9 तर चौथ्या कसोटीत 3 आणि पाटव्या कसोटीत 5 षटके कमी टाकली. इंग्लंडने असे एकूण 19 WTC गुण गमावले आहेत.'
आयसीसीने सांगितल्यानुसार, 'ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत निर्धारित वेळेत ठरल्यापेक्षा 10 षटके कमी टाकली होती. यासाठी त्यांच्या मॅच फीमधील 500 टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात येणार आहे. इंग्लंडच्या खेळाडूंच्या मॅच फीमधून पहिल्या कसोटीसाठी 10 टक्के, दुसऱ्या कसोटीत 45 टक्के, चौथ्या कसोटीसाठी 15 तर पाचव्या कसोटीसाठी 25 टक्के रक्कम कापून घेतली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.