मेलबर्न : आयसीसीच्या पुढच्या फ्युचर टूर्स प्रोग्राम सायकलमध्ये (ICC FTP Cycle) भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाचा तब्बल दोन वेळा दौरा (Australia Tour) कराणार आहे. हे एफटीपी (FTP) सायकल 2024 ते 2032 चे असणार आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी सामन्यांची संख्या देखील चार वरून पाच करण्यात आली आहे.
एज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वृत्तानुसार 'नुकतीच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रक्षेपणाबबात आराखडा आखण्यात आला. या आखाड्यात इंग्लंड (England) आणि भारत पुढच्या एफटीपीमध्ये दोन संपूर्ण कसोटी मालिकेचा दौरा करणार आहेत. या भारताचा दौरा आता चार नाही तर पाच कसोटी सामन्यांचा असणार आहे.'
गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत प्रत्येकी 4 सामन्यांची मालिका खेळला होता. या दोन्ही मालिका भारताने जिंकून इतिहास घडवला होता. सध्याचे आयसीसी एफटीपी सायकल हे 2018 पासून 2023 पर्यंत असणार आहे. ही सायकल आयसीसी वनडे वर्ल्डकप (ICC ODI World Cup 2023) पर्यंत संपणार आहे. हा वर्ल्डकप भारतात पुढच्या वर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे.
दरम्यान, आयसीसीचे संपूर्ण एफटीपी हे या महिन्याच्या शेवटी अधिकृतरित्या जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. आयसीसीची वार्षिक बैठक ही बर्मिंगहममध्ये 25 आणि 26 जुलैला होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियन चाहत्यांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. गेल्या वर्षी झालेली चार कसोटी सामन्यांची मालिका आर्थिक अडचणीतून जाणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी वरदान ठरली होती. या मालिकेतून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 300 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा महसूल मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.