२ एप्रिल २०११… ज्या दिवशी संपूर्ण भारत एमएस धोनीच्या षटकाराने थक्क झाला होता . वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकाराने भारताला २८ वर्षांनंतर विश्वविजेता बनवलं. आज भारताला वर्ल्ड चॅम्पियन होऊन १२ वर्षे पूर्ण झाली आणि रविवारी ICC नेही हा दिवस साजरा केला.
आयसीसीने या निमित्ताने संपूर्ण जगाला एक भेट दिली आहे. यावर्षीही विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळणार आहे आणि रविवारी आयसीसीने या विश्वचषकाचा खास नवीन लोगो लाँच केला आहे.
ICC ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये खेळाबाबत चाहत्यांच्या भावना दाखवण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यास अजून ६ महिने बाकी आहेत. याआधी हा विश्वचषक नवरस वापरून विकसित करण्यात आला. या नवरसात सामन्यादरम्यान अनुभवलेल्या प्रेक्षकांच्या ९ भावना दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विश्वचषक २०२३ नवरसमध्ये आनंद, सामर्थ्य, वेदना, सन्मान, अभिमान, शौर्य, जिद्द, आश्चर्य, उत्कटता दाखवण्यात आले आहे, जे विश्वचषकात दिसलेल्या प्रतिक्रियांचे प्रतिनिधित्व करतात.
हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
पुढील काही महिने महत्वाचे
भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांने वर्ल्डकप बद्दल बोलताना सांगितले की, भारताचा संघ विश्वचषकासाठी खूप उत्सुक आहे. रोहित म्हणाला की वर्ल्ड कपला अजून ६ महिने बाकी आहेत आणि जल्लोष सुरू झाला आहे.
भारतीय कर्णधार म्हणाला की घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि एक कर्णधार म्हणून तो अजिबात वाट पाहू शकत नाहीये. चसेट ट्रॉफी जिंकण्यासाठी तो त्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडणार नाही आणि पुढील काही महिने तो तयारीसाठी स्वत:ला झोकून देईल, असेही त्याने यावेळी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.