World Cup 2023 Schedule Matches In Pune esakal
क्रीडा

World Cup 2023 Schedule : पुणेकरांनो 'या' तारखा राखून ठेवा, मिळणार 5 वर्ल्डकप सामने पाहण्याची संधी

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Schedule Matches In Pune : बीसीसीआय आणि आयसीसीने आज (दि. 27 जून) वनडे वर्ल्डकप 2023 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले. आजपासून बरोबर 100 दिवसांनी म्हणजे 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा कुंभमेळा सुरू होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान भारतातील 10 संघांमध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत. जवळपास दीड महिना भारत संपूर्णपणे क्रिकेटमय होणार आहे.

क्रिकेटच्या या कुंभमेळाचा पुणेकरांना आस्वाद घेण्याची 5 दिवस संधी मिळणार आहे. पुण्यातील गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्डकपमधील 5 सामने खेळण्यात येणार आहेत. यात भारत आणि बांगलादेश या सामन्याचा देखील समावेश आहे.

वर्ल्डकपमधील पुण्यात होणारे सामने

  • 19 ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे

  • 30 ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. क्वालिायर २, पुणे

  • 1 नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. दक्षिण आफ्रिका, पुणे

  • 8 नोव्हेंबर - इंग्लंड वि. क्वालिफायर १, पुणे

  • 12 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मधील तब्बल 5 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत. यातील पहिला सामना हा 19 ऑक्टोबरला होईल. हा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. त्यामुळे या सामन्याची तिकीटे बुक करण्यासाठी पुणेकरांची झुंबड उडेल यात शंका नाही.

यानंतर 30 नोव्हेंबरला अफगाणिस्तान आणि क्वालिफायर 2 सामना असेल तर 1 नोव्हेंबरला न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामना होईल. 8 नोव्हेंबरला इंग्लंड विरूद्ध क्वालिफायर 1 सामना देखील पुण्यातच होणार आहे. झुंजार बांगलादेश बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आव्हान देखील पुण्यातच देणार आहे. हा सामना 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

भारताचे वर्ल्डकपमधील पूर्ण वेळापत्रक

  • पहिला सामना - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई

  • दुसरा सामना - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली

  • तिसरा सामना - भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

  • चौथा सामना - भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

  • पाचवा सामना - भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धर्मशाला

  • सहावा सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ

  • सातवा सामना - भारत विरुद्ध क्वालिफायर 2, 2 नोव्हेंबर, मुंबई

  • आठवा सामना - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता

  • नववा सामना - भारत विरुद्ध क्वालिफायर 1, 11 नोव्हेंबर, बेंगळुरू

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: राज्यात 24 सप्टेंबरपासून चार दिवस मुसळधार पाऊस; मुंबईला सतर्कतेचा इशारा, विदर्भात यलो अलर्ट

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोनं अन् चांदीचा लिलाव, किती रुपयांची झाली विक्री?

Maratha Andolan: मराठा आंदोलकांची रात्री उशिरा शंभुराज देसाईंसोबत दीड तास चर्चा; बैठकीत निघाला महत्त्वाचा तोडगा

२२ September in History: नाटककार-दिग्दर्शक पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे निधन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT