ICC Pitch Rating : आयसीसीने वर्ल्डकप 2023 च्या बाद फेरीतील दोन स्टेडियमवरील खेळपट्टीला सुमार रेटिंग दिलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमला आणि सेमी फायनल सामना झालेले इडन गार्डनची खेळपट्टी ही सुमार (Average) दर्जाची होती असं आयसीसीचं म्हणणं आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सनी पराभव केला होता. यामुळे भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ काही संपवू शकले नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप फायनल सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीचा रिपोर्ट हा आयसीसीचे मॅच रेफ्री अँडी पेक्रॉफ्ट यांनी दिला आहे. हा रिपोर्ट जवळपास एक महिन्यांनी देण्यात आला आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर झालेल्या दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल सामन्याची खेळपट्टी देखील सुमार असल्याचं रेटिंग त्यांनी दिलं आहे. हे रेटिंग सामना अधिकारी जवागल श्रीनाथ यांनी दिलं आहे.
याचबरोबर आयसीसीने भारताच्या कोलकाता येथील दक्षिण अफ्रेकिविरूद्धच्या, लखनौमधील इंग्लंडविरूद्धच्या, अहमदाबाद येथील पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातील खेळपट्ट्यांना देखील सुमार दर्जा मिळाला आहे. चेन्नईतील ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यावेळीच्या खेळपट्टीला देखील सुमार दर्जा मिळाला आहे.
वर्ल्डकप फायनल सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. भारताने देखील कांगारूंना सुरूवातीला धक्के दिले होते. मात्र ट्रॅविस हेडने शतकी खेळी करत भारताच्या हातून सामना हिसकावून घेतला. ऑस्ट्रेलियाने भारताने आव्हान 43 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.