Shubman Gill ICC Ranking  esakal
क्रीडा

Shubman Gill ICC Ranking : बाबरचं राज्य संपलं, शुभमन गिल नवा किंग! आयसीसी रँकिंगमध्ये जवळपास सर्वच श्रेणीत भारत अव्वल

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill ICC Ranking : भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये आपले 8 पैकी 8 सामने जिंकून जागतिक क्रिकेटमधील दादागिरी दाखवून दिली. आता भारताचा आयसीसी रँकिंगमध्ये देखील जवळपास सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण झाला आहे.

भारताचा सलामीवीर आणि प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट बाबर आझमचं राज्य संपवत वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले. तो आता भारताचा वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठणारा सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर चौथाच फलंदाज ठरला आहे.

वनडे आयसीसी बॉलिंग रँकिंगमध्ये देखील भारताचा दबदबा आहे. वर्ल्डकपमध्ये भन्नाट गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराजला दोन गुणांचा फायदा झाला आहे. तो आता अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर कुलदीप यादव चौथ्या आणि जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर पोहचला आहे. मोहम्मद शामीने (10 व्या स्थानावर) सात स्थानांची उसळी घेत टॉप टेनमध्ये स्थान पटकावले.

भारताने आता आयसीसीच्या जवळपास सर्व रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारत वनडे, कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये देखील सांघिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. कसोटी गोलंदाजीत अश्विन अव्वल तर कसोटी अष्टपैलू रँकिंगमध्ये रविंद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. तर टी 20 फलंदाजीत सूर्यकुमार यादव आपलं अव्वल स्थान टिकवून आहे.

भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वत क्षेत्रात अव्वल कामगिरी केली आहे. भारताचे सर्व फलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकीपटू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. याचबरोबर भारताने क्षेत्ररक्षणातही भरीव कामगिरी करत प्रत्येक सामन्यात आपला दबदबा सिद्ध करून दाखवला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT