ICC rates Ahmedabad Pitch : नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ज्या खेळपट्टीवर भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले, त्या खेळपट्टीला आयसीसीने ‘साधारण’ असा शेरा दिला. या खेळपट्टीचा अभ्यास ऑस्ट्रेलियाने अधिक चांगल्या प्रकारे केला. त्यानुसार रणनीती व त्याची अंमलबजावणी करत भारताला नमवत त्यांनी सहाव्यांदा विश्वकरंडक जिंकला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बहुचर्चित अंतिम सामन्यात पॅट कमिंसच्या संघाने भारतीयांचा सहा विकेटने पराभव केला. काळ्या मातीची ही खेळपट्टी दुपारच्या सत्रात खेळायला आव्हानात्मक होती, मात्र सायंकाळी दव पडल्यावर आणि विद्यूत प्रकाशझोतात ती फलंदाजीस एकदम उपयुक्त झाली होती.
याप्रसंगी घरच्या मैदानावर खेळत असतानाही भारतीय संघ या चक्रव्युहात फसला. याच खेळपट्टीबाबत साधारण असा शेरा आयसीसीने मारला, मात्र सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी इतर मैदान अतिशय चांगले असल्याचे म्हटले आहे. दुपारच्या सत्रात फलंदाजी आव्हानात्मक असल्यामुळे भारताला ५० षटकांत जेमतेम २४० धावा करता आल्या आणि हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत पार केले. ट्रॅव्हिस हेडने १२० चेंडूत १३७ धावांची धडाकेबाज खेळी केली.
भारतीय संघ या स्पर्धेत साखळीचे नऊ आणि उपांत्य व अंतिम असे ११ सामने खेळला. यातील चार साखळी सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्यांनाही ‘साधारण’ शेरा मारण्यात आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता, इंग्लंडविरुद्ध लखनौ, पाकिस्तानविरुद्ध अहमदाबाद आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई हे ते चार सामने आहेत. हे सर्व सामने भारताने जिंकले होते.
उपांत्य फेरीचा दुसरा सामना झालेली ईडन गार्डनवरील खेळपट्टीला ‘साधारण’ या श्रेणीत टाकण्यात आले. हा सामना कमी धावसंखेचा झाला होता. त्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.४ षटकांत २१२ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ४७.२ षटकांत पार केले, परंतु त्यांनीही सात विकेट गमावले होते.
वानखेडेची खेळपट्टी उत्तम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेला सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीला ‘उत्तम’ असे रेटिंग देण्यात आले. ऐनवेळी खेळपट्टी बदलली आणि अगोदर नियोजित असलेल्या खेळपट्टीऐवजी या बदललेल्या खेळपट्टीवर सामना खेळवण्यात आला अशी ओरड ऑस्ट्रलियाच्या एका वर्तमानपत्रात करण्यात आली होती. तीच खेळपट्टी आयसीसीच्या मते उत्तम ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.