ICC suspended Pakistan fast-bowler Mohammad Hasnain for illegal bowling action  esakal
क्रीडा

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हसनैनला आयसीसीनं केलं निलंबित

अनिरुद्ध संकपाळ

दुबई:पाकिस्तानचा वेगावान गोलंदाज मोहम्मद हुसैनला (Mohammad Hasnain) आयसीसीने (ICC) त्याच्या संशयास्पद बॉलिंग अ‍ॅक्शनवरून (Bowling Action) निलंबित केले आहे. आयसीसीने मोहम्मद हुसैनच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची लाहोरमधील सेंटरमध्ये तपासणी केली. त्यावेळी त्याची बॉलिंग अॅक्शन दोषपूर्ण आढळून आली. त्यामुळे आयसीसीने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून रोखले आहे.

याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यात 'पीसीबीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोहम्मद हसनैनच्या बॉलिंग अ‍ॅक्शनबाबतचा सविस्तर अहवाल मिळाला आहे. त्यात हसनैनचा गुड लेंथ, फूल लेथ, स्लोवर वाऊन्सर, वाऊन्सर चेंडू टाकता हात कोपरातून 15 अंशापेक्षा जास्त वाकतो असे म्हटले आहे.'

पीसीबी (PCB) आपल्या वक्तव्यात पुढे म्हणते की, 'या अहवालावर पीसीबीने आमच्या बॉलिंग एक्सपर्टशी चर्चा केली. त्यांना असे वाटते की ही समस्या सोडवली जाऊ शकते. पीसीबी आता मोहम्मद हसनैनसाठी एक बॉलिंग सल्लागार नियुक्त करणार आहे जेणेकरून तो आपली बॉलिंग अ‍ॅक्शन सुधारेल.' पीसीबीने हसनैनला जोपर्यंत त्याची बॉलिंग अ‍ॅक्शन सुधारत नाही तोपर्यंत पाकिस्तान सुपर लीगमध्येही सहभागी होण्यापासून रोखले आहे.

'या काळात हसनैन पीसीबीने नियुक्त केलेल्या बॉलिंग सल्लागाराबरोबर आपली बॉलिंग अ‍ॅक्शन सुधारण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर तो पुन्हा एकदा बॉलिंग अ‍ॅक्शन तपासण्यासाठी अर्ज करेल. मोहम्मद हसनैन लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket परतण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.' असेही पीसीबीने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT