ICC T20 World Cup 2022 India Squad Announce  Esakal
क्रीडा

T20WC India Squad : वर्ल्डकपचा संघ केला जाहीर मात्र खाली पांड्यासाठी एक टीपही लिहिली

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20 World Cup 2022 India Squad Announce : बीसीसीआयने आज 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला. याचबरोबर बीसीसीआयने मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी देखील संघ जाहीर केला. आता वर्ल्डकपच्या तोंडावर या मालिका होणार आहेत म्हणजे वर्ल्डकपचाच संघ या मालिकेत देखील खेळेल. संघाचा चांगला सराव देखील होईले असा सर्वांचा ग्रह झाला होता. मात्र बीसीसीआयने जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठीच्या संघात बदल आहेत. याचबरोबर संघ निवडीच्या प्रसिद्धीपत्रकाखाली एक महत्वाची टीप देखील आहे. (Note For Hardik Pandya Bhuvneshwar Kumar And Arshdeep Singh)

भारताने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्याबद्दल एक टीप लिहिली आहे. जर हे खेळाडू वर्ल्डकप संघात असले तरी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी या तिघांना आलटून पालटून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या संघ निवडीच्या पत्रात खाली दिलेल्या नोटमध्ये हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांना कोणत्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे आणि विश्रांतीच्या काळात त्यांनी काय करायचं आहे हे देखील यात नमूद केलं आहे.

भारतात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेदरम्यान हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार हे फिटनेस ट्रेनिंगसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होतील. हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शामी आणि दीपक चाहरची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT