ICC T20 World Cup Qualifier : आयसीसी पुरूष टी 20 वर्ल्डकप पूर्व आशिया - पॅसिफिक पात्रता फेरीत फिलिपिन्सचा 16 वर्षाचा वेगवान गोलंदाज केपलग लुकीजने विश्वविक्रम केला. तो आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात सर्वात कमी वयात 5 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
16 वर्षे आणि 145 दिवस वयाच्या लुकीजने वानुअतू विरूद्धच्या सामन्यात 5 विकेट्स घेत इतिहास रचला. टी 20 वर्ल्डकप पात्रता फेरीत गेल्या शनिवारी फिलिपिन्सला वानुअतूविरूद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र तरी देखील केपलर लुकीजच्या कामगिरीची जगभर चर्चा होती.
94 धावा वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या फिलिपिन्सच्या 16 वर्षाच्या या वेगवान गोलंदाजाने नव्या चेंडूवर वानुअतूच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडवली. (Kepler Lukies Of Philippines Youngest Bowler To Take 5 Wicket)
लुकीजला त्याची पहिली विकेट ही तिसऱ्या षटकात मिळाली. त्याने क्लेमेंट टॉमीला बाद केले. त्याने 1 धाव केली होती. त्यानंतर पुढच्याच षटकात लुकीजने अँड्र्यु मनसेल, रोनाल्ड तारी आणि जोशुआ रासू या तीन विकेट्स घेत वानुअतूच्या गोटात दहशत निर्माण केली होती.
यानंतर लुकीजने ज्यूनियर कल्टापौला बाद करत आपली पाचवी शिकार केली. लुकीजने कल्टापौला खातेही उघडू दिले नाही. लुकीजने 10 धावा देत 5 विकेट्स मिळवल्या. याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयाचा 5 विकेट्स घेणार गोलंदाज ठरला.
यापूर्वी हे रेकॉर्ड सिआरा लियोनच्या सॅम्युअल कोंटेहच्या नावावर होते. त्याने 18 वर्षे आणि 29 दिवस वय असताना 2021 मध्ये नायजेरियाविरूद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या. यापूर्वी हे रेकॉर्ड अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खानच्या नावावर होते.
राशिदने 2017 मध्ये आयर्लंडविरूद्ध टी 20 मध्ये 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्यावेळी त्याचे वय 18 वर्षे 171 दिवस इतके होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.