ICC T20 World Cup
ICC T20 World Cup Sakal
क्रीडा

T20 World Champions To Return Home : विश्‍वविजेत्या भारतीय संघाचे आज आगमन; चाहते स्वागतासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा

ब्रिजटाउन : शनिवारी २९ जून २०२४ रोजी टी-२० विश्‍वकरंडक पटकावणारा भारतीय क्रिकेट संघ तब्बल चार दिवसांनंतर मायदेशात अर्थातच भारतात येणार आहे. वादळामुळे बार्बाडोसमध्येच वास्तव्याला असलेला भारतीय संघ (ता. ३) चार्टर विमानाने भारतात दाखल होणार आहे, अशी माहिती बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली यांनी मंगळवारी दिली.

बार्बाडोसमध्ये बेरील नावाच्या वादळाची शक्यता असल्यामुळे टीम इंडियाचा संघ भारतामध्ये अद्याप येऊ शकला नाही. भारतीय संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, बीसीसीआयचे पदाधिकारी, खेळाडूंचे कुटुंब हे सर्व बार्बाडोसमध्येच अडकले आहेत.

मिया मोटली याप्रसंगी म्हणाले की, काल रात्रीपासून काहींना वाट बघावी लागत आहे. मी वैयक्तिकरित्या विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. येत्या सहा ते १२ तासांमध्ये विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे.

खेळाडू हॉटेलमध्येच

बार्बाडोसमध्ये वादळ येणार होते. त्यामुळे तेथील व्यवस्था ठप्प करण्यात आली होती, मात्र बेरील नावाचे वादळ तेथे आलेच नाही. हे वादळ ८० मैल दूर होते. तरीही काही प्रमाणात नुकसान झाले. याचदरम्यान भारतीय संघाशी संबंधित असलेल्या सर्वांचीच विशेष काळजी घेण्यात आली. हॉटेलमध्ये त्यांना सोयीसुविधा पुरवण्यात आल्या, अशी माहिती मिया मोटली यांनी दिली.

दरम्यान, विश्‍वविजेत्या भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी मायदेशातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचे जल्लोशात ‘वेलकम’ करण्यात येईल यात शंका नाही.

टीम इंडियाचा प्रवास

भारतीय संघ ब्रिजटाउन येथून संध्याकाळी सहा वाजता (तेथील वेळेनुसार) भारतात येण्यासाठी प्रयाण करणार आहे. विश्‍वविजेता टीम इंडियाचा संघ भारतामध्ये बुधवारी रात्री ७.४५ वाजता नवी दिल्लीत पोहोचणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून या वेळी देण्यात आली.

सत्कार सोहळ्याचे आयोजन

भारतीय संघ मायदेशात दाखल झाल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्‍वविजेत्यांना गौरवण्यात येणार आहे, मात्र या सत्कार सोहळ्याचे आयोजन केव्हा होईल, हे निश्‍चित करण्यात आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heavy Rains: विक्रमी पाऊस पडल्यामुळे मुंबईत पाणी साचलं, तरी निचरा वेगाने; CM एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

Marathi Singer New Business: लोकप्रिय गायकाची नवी इनिंग! सुरू केला स्वतःचा व्यवसाय, पुण्यातील या भागात आहे हॉटेल

Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत?; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा, खरा इतिहास काय?

Virat Kohli: कोहलीच्या 'विराट' चौकार-षटकारांमुळे दारू कंपनी झाली मालामाल; कंपनीच्या नफ्यात विक्रमी वाढ

Kiran Mane : "त्यांच्या आठवणीत वारीत नाचून बेभान होतो"; किरण माने यांनी सांगितली वारीची भावूक आठवण

SCROLL FOR NEXT