नवी दिल्ली : मंगळवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार मिताली राजची सातव्या क्रमांकावर घसरण झाली; तर सलामीवीर स्मृती मानधना नवव्या स्थानावर अग्रेसर झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वकरंडक स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या मितालीचे ६८६ रेटिंग गुण आहेत. तिने विश्वकरंडकाच्या सात सामन्यांत २६ च्या सरासरीने १८२ धावा करता आल्या; तर मानधनाने विश्वकरंडकाच्या सात सामन्यांमध्ये ४६.७१ च्या सरासरीने ३२७ धावा केल्या, ज्यामुळे तिचे ६६९ गुण झाले आहेत. तसेच तिची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या १२३ धावांची होती. भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौरच्या क्रमवारीत मात्र एका स्थानाने सुधारणा झाली असून ती १४ व्या स्थानावर पोहोचली आहे. हरमनप्रीतने त्या स्पर्धेत ३१८ धावा फटकावल्या.
हिली, सीव्हर अव्वल
विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत अनेक विक्रम आपल्या नावावर करणारी विजेत्या ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिलीने एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. नताली सीव्हरनेही अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.