नवी दिल्ली : आयसीसी महिला वर्ल्डकपसाठी (ICC Womens World Cup) भारतीय संघाची घोषणा (Indian Team) करण्यात आली आहे. यंदाचा महिला एकदिवसीय वर्ल्डकप हा न्यूझीलंडलमध्ये होणार आहे. या वर्ल्डकपमध्येही भारत - पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे. बीसीसीआयने वर्ल्डकप बरोबरच न्यूझीलंड दौऱ्यावरील टी २० संघाचीही घोषणा केली आहे. (India women's national cricket team)
एकदिवसीय वर्ल्डकप संघाचे नेतृत्व ३९ वर्षाच्या मिताली राजकडे (Mithali Raj) सोपवण्यात आले आहे. यावर्ल्डकपनंतर मिताली राज निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. एकदिवसीय संघातून शिखा पांडे आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांना वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत सांगितले की, या दोघींचा सध्याचा फॉर्म खराब आहे त्यामुळे त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय संघ वर्ल्डकपसाठी रिचा घोष आणि तानिया भाटिया या दोन विकेटकिपर घेऊन जात आहे.
वर्ल्डकप पूर्वी भारत ९ ते २४ फेब्रुवारीपर्यंत न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळणार आहे. यात पाच एकदिवसीय आणि एक टी २० सामना खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) करणार आहे.
भारताचे वर्ल्डकप अभियान ६ मार्चपासून सुरु करणार आहे. भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (India vs Pakistan) बरोबर होणार आहे. त्यानंतर भारत १० मार्चला न्यूझीलंड, १२ मार्चला वेस्ट इंडीज, १६ मार्चला इंग्लंड १९ मार्चला ऑस्ट्रेलिया २२ मार्चला बांगलादेश आणि २७ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. (ICC Womens World Cup India First Match Against Pakistan)
भारतीय एकदिवसीय संघ ( न्यूझीलंड दौरा आणि वर्ल्डकप )
मिताली राज ( कर्णधार ), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष , स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
भारतीय टी २० संघ
हरमनप्रीत कौर ( कर्णधार ), स्मृती मानधना,शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, रिचाा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेधना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एस मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.