ऑकलँड: महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील (ICC Women's World Cup) भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (India Women's vs Australia Women's) आज ऑकलँडमध्ये सामना रंगत आहे. सेमी फायनलमधील प्रवेश सुकर करण्यासाठी भारताला या सामन्यात दमदार कामगिरी करणे गरजेचे होते. दरम्यान ऑस्ट्रेलियाने नाणेफे जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. टीम इंडियानेही दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला समोर 278 धावांचे आव्हान ठेवले. भारताची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) 96 चेंडूत 68 धावा करत यात मोलाचा वाटा उचलला. मिताली राज बरोबरच भारताची मधल्या फळीने देखील चमक दाखवली. त्यानंतर हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) धडाकेबाज फलंदाजी करत भारताला 277 धावांचा टप्पा गाठून दिला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने स्मृती मानधनाच्या स्वरूपात अवघ्या 11 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. स्मृतीला बाद करणाऱ्या ड्रेसी ब्राऊनने 12 धावा करणारी दुसरी सलामीवीर शेफाली वर्माला बाद करत भारताची अवस्था 2 बाद 28 अशी केली होती. मात्र त्यानंतर यस्तिका भाटिया (Yastika Bhatia) आणि कर्णधार मिताली राजने भागीदारी रचत डाव सावरला. या दोघींनी तिसऱ्या विकेट्स 130 धावांची दमदार शतकी भागीदारी रचली. यामुळे भारत दीडशेच्या पार गेला. मिताली राजने 96 चेंडूत 68 धावांची खेळी केली. तर यस्तिका भाटियाने 59 धावांची खेळी करून तिला चांगली साथ दिली.
अर्धशतक ठोकणाऱ्या मिताली आणि भाटिया बाद झाल्यानंतर संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तिने स्लॉग ऑव्हरमध्ये 47 चेंडूत नाबाद 57 धावांची आक्रमक खेळी केली. रिचा घोष आणि स्नेह राणा बाद झाल्यानंतर हरमनला पूजा वस्त्रकारने 28 चेंडूत 34 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांच्या धाडकेबाज फलंदाजीमुळे भारताने 50 षटकात 7 बाद 277 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून ड्रेसी ब्राऊनने 3 तर अॅलेना किंगने 2 विकेट घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.