ICC ODI World Cup 2023 matches in Pune : पाकिस्तानच्या सर्व नकारघंटेला केराची टोपली दाखवत आंतररराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) यांनी आज बहुचर्चित एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक बरोबर स्पर्धेस १०० दिवस शिल्लक असताना जाहीर केले. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात हा क्रिकेट महोत्सव होणार असून भारत-पाक साखळी लढत १५ ऑक्टोबरला अहमदाबादला होणार आहे.
तब्बल १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या विश्वकरंडक स्पर्धेची सलामी होईल आणि सांगताही तेथेच होणार आहे. देशभरात एकूण १० ठिकाणी सामने होणार असून हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुआनंतपूरम येथे सराव सामने होणार आहेत.
पुण्यात २७ वर्षांनंतर ‘वर्ल्डकप’च्या लढती
‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सहकार्याने पुण्यात ‘वर्ल्डकप’ स्पर्धेतील पाच लढती आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला (एमसीए) मिळाला आहे. यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुण्यात २७ वर्षांनंतर ‘वर्ल्डकप’ची लढत होत आहे. यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘एमपीएल संपल्यानंतर लगेचच आम्ही आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करणार आहोत. ही कामे सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून मैदान स्पर्धेसाठी सज्ज ठेवणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.
पाकची मागणी धुडकावली
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे हायब्रीय मॉडेल बीसीसीआयने मान्य केल्यावर विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक तयार करून ते सहभागी संघाच्या क्रिकेट संघटनांकडे मंजुरीसाठी पाठवले होते; परंतु विरोधाला विरोध करणाऱ्या पाक मंडळाकडून अगोदर अहमदाबादला आणि नंतर त्यांचे साखळी सामने होणाऱ्या चेन्नई आणि बंगळूरला केवळ खेळपट्या आणि प्रतिस्पर्धांमुळे विरोध दर्शवला होता; परंतु त्यांचे सर्व विरोध धुडकावत अगोदर तयार केलेले वेळापत्रकच कायम ठेवले.
पाकचा सामना मुंबईत नाही
मुंबई आणि पुण्यामध्ये प्रत्येकी पाच सामने होणार आहेत. त्यापैकी मुंबईतील वानखेडे स्टेडियमला उपांत्य सामन्याचा बहुमान देण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य लढत झाली, तर ती मात्र मुंबईत होणार नसून ती लढत कोलकतामध्ये होईल. मुंबई, पुण्यात भारताचा प्रत्येकी एक साखळी सामना मात्र होणार आहे.
भारताचे सामने
८ ऑक्टोबर : विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)
११ ऑक्टोबर : विरुद्ध अफगाणिस्तान (दिल्ली)
१५ ऑक्टोबर : विरुद्ध पाक (अहमदाबाद)
२२ ऑक्टोबर : विरुद्ध न्यूझीलंड (धरमशाला)
२९ ऑक्टोबर : विरुद्ध इंग्लंड (लखनौ)
२ नोव्हेंबर : विरुद्ध पात्रता फेरीतील संघ (मुंबई)
५ नोव्हेंबर : विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलकता)
११ नोव्हेंबर : विरुद्ध पात्रता फेरीतील संघ (बंगळूर)
सराव सामने : हैदराबाद, गुवाहाटी, तिरुअनंतपूरम
भारताची सलामी ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध
भारताचे नऊही सामने नऊ वेगळेगळ्या ठिकाणी
नऊ ठिकाणी प्रत्येकी पाच सामने, हैदराबादला केवळ तीन सामने.
भारत आणि पाक यांच्यात आत्तापर्यंत एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सात लढती झाल्या आहेत त्या सर्व सामन्यांत भारताने विजय मिळवलेला आहे. पहिल्यांदा हे दोन्ही संघ १९९२ च्या स्पर्धेत आमनेसामने आले होते त्या सामन्यासह १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१९ च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताने बाजी मारलेली आहे. २००७ च्या स्पर्धेत मात्र दोन्ही संघांचे प्राथमिक फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.