World Cup 2023 India Schedule 
क्रीडा

World Cup 2023 India Schedule: तारीख ठरली ! या दिवशी टीम इंडिया भिडणार पाकिस्तानशी, पाहा भारताचे पूर्ण वेळापत्रक

Kiran Mahanavar

ICC World Cup 2023 India Schedule : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 आता फक्त 4 महिने बाकी आहे, ही स्पर्धा जसजशी जवळ येत आहे तसतसा चाहत्यांचा उत्साह वाढत आहे. भारत 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे.

बीसीसीआय आणि आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय क्रिकेट संघ 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशी खेळणार आहे. चला तर मग रोहित अँड कंपनीच्या संपूर्ण विश्वचषकाच्या वेळापत्रकावर एक नजर टाकूया.

भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. गेल्यावेळेप्रमाणेच यावेळीही टीम इंडिया विश्वचषकात पूर्ण 9 सामने खेळणार आहे. टीम इंडियाने गेल्या दोन एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली होती, मात्र दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. गुणतालिकेत अव्वल 4 मधील संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 15 नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना मुंबईत होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे. मात्र, विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

  • पहिला सामना - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई

  • दुसरा सामना - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली

  • तिसरा सामना - भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

  • चौथा सामना - भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

  • पाचवा सामना - भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धर्मशाला

  • सहावा सामना - भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ

  • सातवा सामना - भारत विरुद्ध क्वालिफायर 2, 2 नोव्हेंबर, मुंबई

  • आठवा सामना - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता

  • नववा सामना - भारत विरुद्ध क्वालिफायर 1, 11 नोव्हेंबर, बेंगळुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT