एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेस रवाना होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भारताकडून अजून व्हिसा न दिल्यामुळे पाक क्रिकेट मंडळाने गंभीर चिंता व्यक्त केली होती, परंतु प्रयाणास ४८ तास शिल्लक असताना व्हिसा देण्यात आल्याचे आयसीसीने जाहीर केले.
संघाला व्हिसा न मिळल्यावरुन खेळाडूंमध्ये चलबिलच निर्माण झाली आहे आणि त्याचा परिणाम आमच्या तयारीवर होत आहे, असा आरोप पाक क्रिकेट मंडळाकडून करण्यात आला होता.
भारतात येण्याअगोदर पाकचा संघ दोन दिवस दुबईत सराव करणार होता, परंतु व्हिसाच न मिळाल्यामुळे त्यांना दुबईवारी रद्द करावी लागली. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यास भारतात येणारा पाकचा संघ हैदराबादमध्ये पहिला सराव सामना २९ सप्टेंबर रोजी खेळणार आहे.
भारतात विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी व्हिसाचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून सोडवण्यात आलेला नाही, अशा प्रकारे आम्हाला देण्यात येणारी वागणूक सहन करणे संतापजनक आहे, अशा आशयाचे पत्र पाक क्रिकेट मंडळाने आयसीचे सीईओ जॉफ अलकार्डिस यांना लिहिले होते. पाक संघाला व्हिसा देण्यात आला असे आयसीसीने जाहीर केले असले तरी पाक संघात मात्र अजूनही साशंकता आहे.
विश्वकरंडकासारखी मोठी स्पर्धा असताना व्हिसासाठी अशा प्रकारचा अतिविलंब चिंता करणारा आहे, अशी नाराजी पाक क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते उमर फारुक यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.