ICC World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा फायनल कसोटी सामन्याचा पहिला दिवसावर पावसाने पाणी फेरले. साउदम्टनच्या मैदानात पावसाने उसंत घेतल्यानंतर मैदानातील ओलाव्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सुरुच झाला नाही. पंचांनी मैदानाची पहाणी केल्यानंतर पहिल्यादिवसाचा खेळ टॉसविना थांबवण्याचा निर्णय घेतला. स्थानिक हवामान खात्याने पुढील काही दिवसही पावसाचा अंदाज वर्तवला असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर उद्याही पावसाचे ढग कायम राहणार असल्याचे दिसते. (ICC World Test Championship Final INDvsNZ Day 1 has been called off due to rains)
मर्यादीत षटकांचा वर्ल्ड कप आणि टी-20 वर्ल्ड कपनंतर आयसीसीने पहिल्यांदाच कसोटीमधील मोठ्या स्पर्धेला सुरुवात केली होती. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून दोन वर्षांतील कामगिरीच्या जोरावर कसोटी जगतातील नंबर वन संघ ठरवण्यात येणार आहे. विजेत्या संघाला मोठे बक्षीस आणि ट्रॉफीसह मानाची गदा देण्यात येणार आहे. पहिली वहिली-स्पर्धा जिंकून इतिहास घडवण्यासाठी दोन्ही कर्णधार सज्ज असले तरी पावसामुळे सामन्याचा निकाल लागणे मुश्किल होऊ शकते.
कसोटीतील मोठ्या स्पर्धेसाठी आयसीसीने केवळ एक दिवस अतिरिक्त दिला आहे. त्यामुळे वाया गेलेला दिवस भरुन काढण्यासाठी तुर्तास एक दिवस निश्चितच आहे. पण उर्वरित दिवसातही पावासाची शक्यता असल्यामुळे मेगा फायनलचा खेळाचा पावसामुळे खेळखंडोबा होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसामुळे खेळपट्टीचा रंगही बदलू शकतो. ती फलंदाजांच्या फायद्याची ठरणार की गोलंदाजांना साथ देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.