Rohit Sharma E sakal
क्रीडा

WTC : चॅम्पियन्स रुबाबसाठी हिटमॅनचा तोरा ठरेल महत्त्वाचा

सुशांत जाधव

ICC World Test Championship: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातून क्रिकेट जगताला पहिला टेस्ट चॅम्पियन संघ मिळणार आहे. इंग्लंडमधील साउथहॅम्टनच्या मैदानात दोन्ही संघामध्ये कांटे की टक्कर पाहाला मिळेल. भारतीय संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. याशिवाय युवा खेळाडूंचा जोश टीम इंडियाची ताकत आणखी वाढते. पण टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही, हा इतिहास देखील आपल्याला विसरुन चालणार नाही. इंग्लंडच्या मैदानात टीम इंडिया नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार कामगिरीसाठी हिटमॅन रोहित शर्माची बॅट तळपणे भारतीय संघाच्या फायद्याचे असेल. त्याने भारतीय संघाच्या डावाला दमदार सुरुवात करुन दिली तर टीम इंडियाची गणितं सहज सोपी होतील. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि अन्य खेळाडूंशिवाय रोहितकडून अधिक अपेक्षा आहेत. याला खास कारणही आहे. (ICC World Test Championship Rohit Sharma Record)

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी नोंदवली आहे. मर्यादित षटकातील हिटमॅन चॅम्पयनशिप स्पर्धेतही हिट ठरलाय. दुखापतीमुळे काही कसोटी सामन्याला त्याला मुकावेही लागले. त्याने 11 सामन्यात 64.37 च्या सरासरीने 1,030 धावा केल्या आहेत. भारताकडून चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक 4 शतके ही त्याच्या नावे आहेत. त्यामुळे फायनलमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारतीय संघाकडून आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील सर्व सामन्यात खेणाऱ्या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. पुजाराने 17 सामन्यात 818 धावा केल्या आहेत. त्याला एकही शतक झळकवता आलेले नाही. भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने 17 सामने खेळले असून त्याने 43.80 च्या सरासरीने 1,095 धावा केल्या आहेत. रहाणेच्या नावे 3 शतकांची नोंद आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात एका शतकाचे अंतर आहे. अजिंक्य रहाणेपेक्षा 6 मॅचेस कमी खेळूनही रोहितने त्याच्यापेक्षा एक शतक अधिक केले असून सरासरीही उत्तम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT