Ind vs Afg 1st T20 Mohali Weather 
क्रीडा

Ind vs Afg Mohali Weather : 'ये तो धुंवा है... आसमान थोडी है...' थंडीत भारतीय खेळाडूंचे सुरू आहेत हाल! BCCI चा Video Viral

India Vs Afghanistan T20I Series News :

Kiran Mahanavar

Ind vs Afg 1st T20 Mohali Weather : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मोहालीत थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना थंडीत खेळणे कठीण झाले आहे.

सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडूंना थंडीचा त्रास होताना दिसत आहे. बीसीसीआयने गुरुवारी (11 जानेवारी) सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडूंनी आपले थंडीबाबतचे अनुभव सांगितले.

सामन्यापूर्वी मोहालीत थंडीमुळे खेळाडूंनी टोप्या, हातमोजे आणि स्वेटर घातलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अक्षर पटेल किती डिग्री आहे असे विचारत आहे. यानंतर अर्शदीप सिंहने गंमतीत सांगितले की, खूप गरम वाटत आहे. थोडी थंडी पडली असती तर बरं झालं असतं. यासोबतच अर्शदीपने तोंडातून हवा सोडली आणि खूप गरम असल्याचे सांगितले.

यानंतर शुभमन गिल म्हणाला की, खूप थंडी आहे. माझ्या मते तापमान 7 अंश असेल. मी माझे हात माझ्या खिशात ठेवले, परंतु तुमच्या खिशात हात गरम केल्याशिवाय मी याची शिफारस करणार नाही. आवेश खान म्हणाला की, 'ये तो धुंवा है... आसमान थोडी है..

उत्कृष्ट फिनिशर रिंकू सिंगने सांगितले की, खूप थंडी आहे. मी नुकताच केरळमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटचा रणजी ट्रॉफी सामना खेळून परत आलो आहे, जेथे मे किंवा जून महिन्याइतकीच उष्णता होती.

यानंतर शिवम दुबे म्हणाला की, या सीझनमध्ये क्रिकेट खेळणे मोठे आव्हान असेल, पण मजाही असेल. व्हिडिओमध्ये टीमचे सर्व खेळाडू थंडीमुळे त्रस्त दिसत आहेत. बीसीसीआयचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तान संघ : हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, नूर अहमद, मोहम्मद सलीम साफी, करीम जनात, इकराम अलीखिल, फरीद अहमद मलिक, रहमत शाह, गुलबदिन नायब

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रवी बिश्नोई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT