India vs Afghanistan Series News : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ भारतीय संघापासून दूर आहे. अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच जाहीर झालेल्या संघातही तो नाही. हार्दिकच्या दुखापतीची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे. दुखापतीमुळे तो अनेकदा संघाबाहेर दिसला आहे. पण धोनीचा पठ्ठ्या अष्टपैलू शिवम दुबे पांड्याची पोकळी भरून काढू शकतो. रणजी ट्रॉफीमधील कामगिरीनंतर याचा अंदाज लावल्या जात आहे.
मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबेने रणजी ट्रॉफीमध्ये कहर केला आहे. बिहारविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रथम 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावांची शानदार खेळी केली आणि नंतर गोलंदाजी करताना 6 विकेट घेतल्या.
बिहारविरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 251 धावा फलकावर लावल्या, या धावसंख्येसमोर बिहारचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 100 धावांवरच मर्यादित राहिला. यादरम्यान दुबेने दोन गडी बाद केले. मुंबईने बिहारला फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजी करण्यास सांगितले. दुसऱ्या डावात मुंबईने पुन्हा बिहारला 100 धावांत गुंडाळले आणि सामना एक डाव आणि 51 धावांनी जिंकला. दुबेने दुसऱ्या डावात 11 पैकी 7 षटके टाकली आणि 4 बळी घेतले.
हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. जेव्हा तो संघाबाहेर असतो तेव्हा त्याच्या अनुपस्थितीचा परिणाम प्लेइंग इलेव्हनच्या संतुलनावर नक्कीच दिसून येतो. हार्दिक पांड्या उत्कृष्ट फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान देतो. पण तो नसताना कर्णधाराला त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये 2-2 बदल करावे लागतात.
आयपीएल 2023 मध्ये शिवम दुबेला अनेक शानदार खेळी खेळताना आपण पाहिले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने बरेच लांब षटकार मारले आहेत. पण गोलंदाजीत तो थोडा कमजोर होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने रणजी ट्रॉफीमध्ये केली तशी कामगिरी केल्यास तो हार्दिक पांड्याला नक्कीच टक्कर देऊ शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.