Ind vs Aus 1st ODI Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या वनडे सामन्यात दोन्ही संघ मोहालीच्या मैदानावर आमनेसामने येतील. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही एकदिवसीय मालिका पुढील महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सामन्यात भारतीय संघ नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर असणार आहेत.
ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलसह भारताकडून सलामी करताना दिसणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन तर केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे मधल्या फळीत दिसणार आहेत.
रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेइंग 11 चा भाग असेल. याशिवाय टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर.अश्विनचाही समावेश होऊ शकतो. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. त्याचवेळी, मोहम्मद सिराजला पहिल्या वनडे सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.
भारतीय संघ व्यवस्थापनाच्या नजरा यावेळी जास्त श्रेयस अय्यर आणि आर अश्विनवर असतील. कारण आशिया कपमध्ये श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले, पण तो एकच सामना खेळू शकला. त्याचवेळी आर अश्विनचे तब्बल 18 महिन्यांनंतर वनडे संघात पुनरागमन होत आहे.
अक्षर पटेलच्या जागी आर अश्विनला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका अश्विनसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. रवी अश्विनची कामगिरी चांगली राहिल्यास आगामी वर्ल्डकपसाठी त्याच्यासाठी दरवाजे उघडू शकतात, असे मानले जात आहे.
ही असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11
ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.