पहिला कसोटी सामना इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हते अन्... ind vs aus 1st test Ravindra Jadeja r Ashwin Axar Patel Bowling Captain Rohit Sharma Questions cricket news  
क्रीडा

IND vs AUS: तिघेही माहीर! आधी कुणाला गोलंदाजी द्यायची; कॅप्टन रोहितला पडला प्रश्न

पहिला कसोटी सामना इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हते अन्...

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia Test Series : पहिला कसोटी सामना इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव एका सत्रात आटोपला जाईल असा विचार तर अजिबात केला नव्हता. याचे संपूर्ण श्रेय आपल्या तीन दादा फिरकी गोलंदाजांना जाते ज्यांनी अव्याहतपणे समोरच्या फलंदाजांवर दडपण ठेवले. अश्विन, जडेजा आणि अक्षर संघात असल्याचा मोठा फायदा आहे. तिघांपैकी कोणाला मारा करायला बोलवायचे हा माझ्यासमोर प्रश्न असतो. सगळेच गोलंदाजी करायला सतत उत्सुक असतात, अशी प्रशंसा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यानंतर केली.

खेळपट्टी चांगली होती. चेंडूला वेग मिळत नव्हता आणि उसळीही कमी होती. आपल्या गोलंदाजांकडे असलेले कौशल्य त्यांच्या सुधारणेच्या ध्यासातून आले आहे. अश्विनने आपल्या भात्यात वेगवेगळी अस्त्रं कष्टाने जमा केली आहेत. जडेजा तर फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे अफलातून पॅकेज आहे. आम्ही पाच दिवस कठोर परिश्रम करायच्या तयारीने सामन्यात उतरतो होतो, असे रोहितने सामन्यानंतर सांगितले.

तो पुढे म्हणाला, खेळपट्टी आव्हानात्मक होती त्यामुळे सगळे प्रमुख फलंदाज एकत्र चमकणार नाहीत. त्यामुळे छोट्या भागीदाऱ्या रचण्यावर आमचा भर होता. संघाला गरज असताना माझ्याकडून शतकी खेळी झाली याचे समाधान व आनंद आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून सामन्याअगोदर केलेला योग्य सराव कामी आला.

ऑस्ट्रेलियाकडून जोरदार प्रतिकार अपेक्षित

मालिका चार सामन्यांची आहे आणि ऑस्ट्रेलियन संघ जोरदार पुनरागमन करू शकतो याची आम्हाला जाणीव आहे. त्यांच्या संघातील खेळाच्यात तशी क्षमता आहे. आम्ही मागे काय झाले याचा विचार न करता वर्तमानकाळात राहून चांगले क्रिकेट परत कसे खेळता येईल याचा विचार करतो आहोत, असे रोहित म्हणाला.

सामना विसरलेलाच बरा: कमिन्स

नागपूर कसोटी सामन्याचा विचार करण्यापेक्षा हा सामना विसरलेला बरा. आमचे सगळेच आडाखे चुकले. फलंदाजांना सतत संभ्रमात टाकण्यात भारतीय फिरकी गोलंदाज यशस्वी ठरले. त्यांच्या गोलंदाजांच्यात सातत्य आहे. तसेच त्यांना फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळायचा अनुभव आहे. आणि कौशल्यही हे मान्य करावे लागेल, असे ऑस्ट्रेलिया कर्णधार कमिन्सने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT