IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही. दिवशी सुरुवातीच्या षटकांमध्येच अर्धशतक झळकावणाऱ्या रवींद्र जडेजाची विकेट पडली. टॉड मर्फीने रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची भागीदारी तोडली.
पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या टॉड मर्फीने रवींद्र जडेजाला बोल्ड केले. रवींद्र जडेजाला ऑफस्पिनर मर्फीचा चेंडू समजला नाही. चेंडू पडल्यानंतर वळेल अशी त्याला आशा होती. जडेजा आपली बॅट उचलतो, पण पडल्यानंतर चेंडू सरळ राहिला आणि ऑफ स्टंपला लागला. 70 धावांची उत्कृष्ट खेळी केल्यानंतर रवींद्र जडेजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. जडेजाने 185 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार मारले.
रवींद्र जडेजाने अक्षर पटेलसोबत 8व्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. या सामन्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीने भारतासाठी 76 धावांची भर घातली.
टॉड मर्फी हा कसोटी सामन्याच्या एका डावात 5 विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा सर्वात तरुण फिरकी गोलंदाज ठरला आहे. वयाच्या 22 वर्षे 87 दिवसात त्याने हा पराक्रम केला आहे. 1881/82 मध्ये जॉय पामरने 22 वर्षे 360 दिवस वयात 5 विकेट घेतल्या होत्या. महान शेन वॉर्नने वयाच्या 23 वर्षे 108 दिवसांत पहिल्यांदा कसोटी डावात 5 विकेट घेतल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.